Maharashtra Government: शिवसेना राष्ट्रवादीला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्यास तयार- सूत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 09:42 AM2019-11-25T09:42:45+5:302019-11-25T09:43:22+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलेला असतानाच आणखी एक मोठी बातमी येऊन धडकली आहे.

Maharashtra Government: Shiv Sena ready to give NCP as chief minister for two and a half years | Maharashtra Government: शिवसेना राष्ट्रवादीला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्यास तयार- सूत्र

Maharashtra Government: शिवसेना राष्ट्रवादीला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्यास तयार- सूत्र

Next

मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलेला असतानाच आणखी एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. शिवसेनाशरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्यासाठी तयार झाली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची शुक्रवारी रात्री एक बैठक झाली, त्या बैठकीत शिवसेनेनं मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी सकाळी सकाळीच अजित पवारांनी भाजपाबरोबर सरकार बनवलं आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. 

शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला पाच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्याचं जवळपास निश्चित केलं होतं. तसेच उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रिपदासाठी नाव पुढे करण्यात आलं होतं. त्यामुळेच अजित पवार नाराज होऊन बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना राष्ट्रवादीला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्यास तयार झाल्याचं बोललं जातंय. शनिवारी अजित पवारांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांच्या वागण्याचा आम्हाला आधीच संशय आला होता, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बोलूनही दाखवलं होतं. 

भाजपाला 155 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं राज्यपालांनी उचललेल्या पावलाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयानं रविवारी महाविकास आघाडीच्या याचिकेची दखल घेतली असून, आज पुन्हा त्यावर सुनावणी होणार आहे. याचदरम्यान भाजपानं दावा केला आहे की, त्यांच्याकडे 155 आमदारांचं समर्थन आहे. यात भाजपाचे 105, अजित पवार समर्थक 25 आमदार आणि 15 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. तर महाविकास आघाडीनं आमच्याकडे 161 आमदारांचं संख्याबळ असून, शिवसेना 56, काँग्रेस 44 आणि राष्ट्रवादी 53 आणि 8 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी लवकर राज्यपालांना या आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवणार आहे. 

Web Title: Maharashtra Government: Shiv Sena ready to give NCP as chief minister for two and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.