'मी आता पवार...; अजित पवारांची भेट घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंची पहिली प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 02:52 PM2023-07-04T14:52:55+5:302023-07-04T14:53:24+5:30

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील अजित पवारांसह आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Maharashtra Political Crisis mla Prajakt Tanpure's first reaction after meeting Ajit Pawar | 'मी आता पवार...; अजित पवारांची भेट घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंची पहिली प्रतिक्रीया

'मी आता पवार...; अजित पवारांची भेट घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंची पहिली प्रतिक्रीया

googlenewsNext

मुंबई- राष्ट्रवादीतील अजित पवारांसह (Ajit Pawar) आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे, आता राष्ट्रवादीचे ९ आमदार सोडून बाकीचे सर्व आमदार शरद पवार यांच्या सोबत असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.  तर दुसरीकडे जयंत पाटील यांचे भाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. पवार यांच्या भेटीनंतर तनपुरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 

जयंत पाटलांचा खास NCP आमदार अजित पवारांच्या गळाला?; देवगिरी बंगल्यावर घेतली भेट

प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांसोबत असल्याचे कालपर्यंत सांगण्यात येत होते. परंतु आज सकाळी तनपुरे यांनी अजितदादांची भेट घेतल्याने आता प्राजक्त तनपुरे अजित पवारांच्या गळाला लागलेत का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. इंदापूरचे आमदार दत्ता भरणे हेदेखील देवगिरी बंगल्यावर अजितदादांच्या भेटीला आले होते. आज सकाळपासून अनेकजण अजित पवारांची भेट घेत आहेत. दरम्यान या भेटीवर बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले, मी बाजू बदलेली नाही. मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबतच आहे. पक्षासोबतच राहणार आहे, असं स्पष्ट तनपुरे यांनी सांगितले. 

आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले. आता या भेटवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. (Maharashtra Political Crisis)

रविवारी दुपारी अजित पवारांसह राष्ट्रवादीतील ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, धर्मरावबाबा अत्राम  या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याची चर्चा सुरू झाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारवाईचा इशारा दिला.  
 
काल अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील या घडामोडीत पक्षाचे चिन्ह आणि नावावर दावा केला आहे. त्यानंतर प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करावे असे पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra Political Crisis mla Prajakt Tanpure's first reaction after meeting Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.