आपलं नाणं चालणार नाही म्हणून बॅनरवर फोटो; शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 04:51 PM2023-07-05T16:51:10+5:302023-07-05T16:53:23+5:30

राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे.

Maharashtra Political Crisis Photo on banner as our coin will not work Sharad Pawar's counter attack on Ajit Pawar | आपलं नाणं चालणार नाही म्हणून बॅनरवर फोटो; शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार

आपलं नाणं चालणार नाही म्हणून बॅनरवर फोटो; शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार

googlenewsNext

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)उभी फूट पडल्यानंतर आज मुंबईत खासदार शरद पवार यांचा तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले. तर शरद पवार यांनीही अजित पवार यांच्यावर पलटवार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार अन्य ८ नेत्यांनी भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाले आहेत. यावरुन आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. 

मला पांडुरंग म्हणायचे आणि आरोप करायचे; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

कालच शरद पवार (Sharad Pawar) यांनी माझा फोटो न वापरण्याचे आवाहन केले होते. आज अजित पवार यांच्या बैठकीतील बॅनरवर शरद पवार यांचे फोटो वापरण्यात आले होते, यावरुन पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार म्हणाले, आपलं नाण चालणार नाही हे त्यांना माहित आहे, म्हणून ते माझा फोटो प्रत्येक बॅनरवर वापरत आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला. 

शरद पवार म्हणाले, शिवसेनेसोबत जे झाले ते राष्ट्रवादीसोबत सुरु. आपले काही लोक त्यांच्यासोबत गेले आहेत. ते पुन्हा येण्यासाठी अस्वस्थ आहेत. मला पांडुरंग म्हणायचे आणि आरोप करायचे. माझ्या नाव, फोटोशिवाय यांचे नाणे चालणार नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवारांना सुनावले.

23 वर्षापूर्वी राष्ट्रवादीचा जन्म झाला. राष्ट्रवादीने अनेक नेते तयार केले. संपूर्ण देशाचं आजच्या बैठकीकडे लक्ष आहे. तुमच्या मदतीने, कष्टाने पक्षबांधणीत यशस्वी झालो. आम्ही सर्वजण सत्ताधारी पक्षात नाही, लोकांमध्ये आहोत. लोकशाही टिकवायची असेल तर संवाद महत्वाचा आहे. मात्र देशात संवाद राहिलेला नाही. कार्यकर्त्यांनी कष्टानं पक्ष उभा केला. विरोधकांना एकत्र करायचं काम सुरु आहे. देशाचे नेते म्हणून बोलताना सभ्यता बाळगावी लागते, असे शरद पवार म्हणाले. 

Web Title: Maharashtra Political Crisis Photo on banner as our coin will not work Sharad Pawar's counter attack on Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.