Maharashtra Politics : अजित पवार भाजपच्या संपर्कात आहेत का? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 03:01 PM2023-04-19T15:01:56+5:302023-04-19T15:09:59+5:30
Maharashtra Politics : काही दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षननेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Maharashtra Politics : मुंबई- गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षननेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांनी पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द केल्यामुळे या चर्चांना जोर आला. पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी सोडून काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. दरम्यान काल पवार यांनी स्वत: पत्रकार परिषदत घेत या चर्चांना पूर्णविराम दिला. पण, पवार खरच भाजपच्या संपर्कात आहेत का अशा चर्चा अजुनही सुरूच आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपकडे (BJP) अजुनही कोणताही असा प्रस्ताव आलेला नाही. अजित पवार यांच्याविषयी अशा चर्चा कोण घडवून आणतंय हे पहावा लागणार आहे. अजितदादा यांनीही कधीही भाजपशी संपर्क केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या इमेजला डॅमेज होईल अशी चुकीची माहिती मी सांगणार नाही. या चुकीच्या बातम्या करण्यात आल्या, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.
"उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर या चर्चा सुरू झाल्या आहेत. संजय राऊत कोणाचे ऐकतात हे आम्हाला पाहण्याची गरज नाही. महाविकास आघाडीमध्येच अजित पवार यांच्या इमेजवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला. (Maharashtra Politics )
'मी महाविकास आघाडीचा चौकीदार....;
अजित पवारांनी माझ्यावर टीका केली की नाही हे माहिती नाही. अजित पवारांच्या बदनामीची मोहिम सुरू झाली त्यावर आम्ही भूमिका मांडली. जेव्हा शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा शरद पवारांपासून, अजित पवारांपर्यंत सगळ्यांनी भूमिका घेतली होती. ती भूमिका आम्ही राष्ट्रवादीच्या बाबतीत घेतली त्यात चुकीचे काय अशा शब्दात संजय राऊतांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. महाविकास आघाडी टिकावी, राहावी आणि भक्कम व्हावी यासाठी आम्ही चौकीदारी करतो. त्यात अजित पवारसुद्धा आहेत. भाजपाची कारस्थाने रोज आमच्याविरोधात होतायेत ती उधळणे आमचे काम आहे. अजित पवारांबाबत ज्या अफवा पसरवण्यात आल्या त्याला पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या ऐक्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. मविआत संभ्रम आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करतायेत. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मविआला तडा जाणार नाही हे अजित पवार यांनी स्पष्ट आणि परखडपणे सांगितले असंही त्यांनी सांगितले.