Sharad Pawar: अजित पवार गैरहजर, नाराज आहेत का? शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 06:35 PM2023-05-05T18:35:02+5:302023-05-05T18:38:11+5:30

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.

Maharashtra Politics Is Ajit Pawar absent, upset? Sharad Pawar clearly said | Sharad Pawar: अजित पवार गैरहजर, नाराज आहेत का? शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar: अजित पवार गैरहजर, नाराज आहेत का? शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. २ मे रोजी शरद पवारांनीराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचे जाहीर केले होते. त्यांच्या निर्णयानंतर पक्षातून तीव्र विरोध झाला. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि दिग्गज नेत्यांनी त्यांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. आज पत्रकार परिषद घेत पवार यांनी आपला निर्णय मागे घेण्याची घोषणा केली आहे, या पत्रकार परिषद दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार गैरहजर होते. यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या संदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात यावेळी पवार यांनी अजित पवार यांच्या संदर्भात माहिती दिली. 

शरद पवार म्हणाले, पत्रकार परिषदेला सर्वच नेते उपस्थित असतात का, ते नाहीत म्हणजे नाराज असं नाही. यावेळी पवार म्हणाले २ मे रोजी वाय.बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी सभागृहात कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा विरोध केला होता. यावेळी पक्षाचे नेतेही निर्णयाचा विरोध करत होते, पण विरोधी पक्षनेते अजित पवार विरोध करत नव्हते, यावर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. यावर शरद पवार म्हणाले, मी  माझ्या राजीनाम्याचा विचार अजित पवारांकडे व्यक्त केला‌ होता, इतरांना याबाबत कल्पना दिली नव्हती, असंही शरद पवार म्हणाले.  

Sharad Pawar: मोठी बातमी! शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय अखेर मागे, म्हणाले...

आज पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, मी 2 मे रोजी माझ्या 'लोक माझे सांगाती' ह्या आत्मचरित्रपराच्या अनावरण समारंभावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भुमिका होती. पण, मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती' असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यानी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने 'मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.

Web Title: Maharashtra Politics Is Ajit Pawar absent, upset? Sharad Pawar clearly said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.