Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 09:37 PM2024-10-27T21:37:00+5:302024-10-27T21:42:22+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress fourth list announced; Candidates changed in two assembly constituencies | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत चौदा उमेदवारांचा समावेश आहे. तर याआधी अंधेरी पश्चिम विधानसभेत जाहीर  केलेल्या उमेदवारांमध्ये बदल केला आहे. याआधी सचिन सावंत यांच्या नावाची घोषणा केली होती. आता या जागेवर अशोक जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर पंढरपूर विधानसभेसाठी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?

अंधेरी पश्चिम येथे आधी काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी जाहीर केली होती, पण त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला त्यामुळे आता काँग्रेसने अशोक जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. वरोरामधून प्रवीण काकडे यांना तिकिट जाहीर केले आहे. तर नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून संदीप पांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

काँग्रेसने आज अधिकृत चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत अंधेरी पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या जागांवरील उमेदवारांची नावे बदलली आहेत. तर सोलापूर दक्षिणमधून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  या जागेवर याआधीच ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. पाटील उद्या अर्ज दाखल करणार होते, त्याआधीच काँग्रेसने तिथे उमेदवार दिला आहे. यामुळे आता या मतदारसंघात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण या चर्चा सुरू आहेत.

या उमेदवारांना मिळाली संधी

१.अमळनेर : डॉ.अनिल शिंदे

२. उमरेड - अनुसूचित जाती: संजय नारायणराव मेश्राम 

३. आरमोरी - एसटी : रामदास मसराम 

४. चंद्रपूर - अनुसूचित जाती: प्रवीण नानाजी पाडवेकर 

५. बल्लारपूर : संतोषसिंग चंदनसिंग रावत 

६. वरोरा : प्रवीण सुरेश काकडे 

७. नांदेड उत्तर : अब्दुल सत्तार अब्दुल गफूर 

८. औरंगाबाद पूर्व : लहू एच. शेवाळे 

९. नालासोपारा : संदीप पांडे

 १०. अंधेरी : अशोक जाधव पश्चिम 

११. शिवाजीनगर : दत्तात्रय बहिरट 

१२. पुणे कॅन्टोन्मेंट - अनुसूचित जाती: रमेश आनंदराव भागवे 

१३. सोलापूर दक्षिण : दिलीप ब्रह्मदेव माने 

१४. पंढरपूर : भगीरथ भालके

 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress fourth list announced; Candidates changed in two assembly constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.