Maharashtra Cabinet Ministers List 2019 : अखेर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं खातेवाटप ठरलं; संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 06:35 PM2020-01-04T18:35:37+5:302020-01-04T18:45:30+5:30

Maharashtra Cabinet Ministers List 2019 : राष्ट्रवादी आणि काँग्रेसची खातेवाटपाची संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती लागली आहे. 

Maharashtra Vikas Aghadi (MVA) government: Congress, NCP declared today list of Maharashtra Portfolio Distribution | Maharashtra Cabinet Ministers List 2019 : अखेर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं खातेवाटप ठरलं; संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती

Maharashtra Cabinet Ministers List 2019 : अखेर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं खातेवाटप ठरलं; संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती

googlenewsNext

मुंबई: राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारचा खातेवाटपावरून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. या खातेवाटपाची यादी अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाली नाही. मात्र, या सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांची खातेवाटपाची यादी निश्चित झाली असून ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची खातेवाटपाची ही संपूर्ण यादी 'लोकमत'च्या हाती लागली आहे. 

या यादीनुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला वित्त व नियोजन, जलसंपदा, गृह, अन्न व नागरी पुरवठा अशी महत्त्वाची खाती आली आहेत. तर काँग्रेसच्या वाट्याला महसूल, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालकल्याण, उर्जा अशी खाती आली आहेत. मात्र, शिवसेनेकडून अद्याप खाते वाटपाची यादी जाहीर करण्यात आली नाही.  30 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तारात 36 मंत्र्यांचा शपथविधी झाला. मात्र त्यानंतरही खातेवाटप जाहीर न झाल्याने आघाडीत खात्यांवरून वाद असल्याची चर्चा सुरू होती. 

राष्ट्रवादी खातेवाटपाची यादी
१. अजित पवार - वित्त व नियोजन (अर्थमंत्री)
२. जयंत पाटील - जलसंपदा
३. छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा
४. अनिल देशमुख - गृह
५. दिलीप वळसे पाटील - उत्पादन शुल्क व कौशल्य विकास
६. धनंजय मुंडे - सामाजिक न्याय 
७. हसन मुश्रीफ - ग्रामविकास
८. बाळासाहेब पाटील - सहकार व पणन
९. राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन 
१०. राजेश टोपे - आरोग्य 
११. जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण 
१२. नवाब मलिक - कामगार, अल्पसंख्याक विकास

काँग्रेस खातेवाटपाची यादी
१. बाळासाहेब थोरात महसूल
२. अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम
३. के सी पाडवी - आदिवासी विकास
४. विजय वड्डेटीवार - ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन
५. यशोमती ठाकूर - महिला बालविकास
६. वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण 
७. अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य
८. सुनिल केदार - क्रीडा व युवक कल्याण, पशुसंवर्धन, दुग्धविकास 
९. अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे
१०. नितीन राऊत - ऊर्जा

राज्यमंत्री (काँग्रेस):
बंटी पाटील - गृह, गृहनिर्माण
विश्वजीत कदम - सहकार, कृषी

Web Title: Maharashtra Vikas Aghadi (MVA) government: Congress, NCP declared today list of Maharashtra Portfolio Distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.