Maharashtra Winter Session: जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमानंतर अजित दादा खूश होते! गोपीचंद पडळकर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 01:30 PM2022-12-23T13:30:02+5:302022-12-23T15:21:57+5:30

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन कालावधीत निलंबित करण्यात आले आहे.

Maharashtra Winter Session Ajit Pawar happy after Jayant Patil's suspension Gopichand Padalkar criticized | Maharashtra Winter Session: जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमानंतर अजित दादा खूश होते! गोपीचंद पडळकर स्पष्टच बोलले

Maharashtra Winter Session: जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमानंतर अजित दादा खूश होते! गोपीचंद पडळकर स्पष्टच बोलले

googlenewsNext

मुंबई- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन कालावधीत निलंबित करण्यात आले आहे. काल हिवाळी अधिवेशनात आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्याचा आरोप सत्ताधारी गटातील सदस्यांनी केला होता. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही जयंत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. 

'जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम झाला. काल अजित पवार खूश होते, सरकार पडल्यानंतर काल पहिल्यांदा मी एवढ अजित पवार यांनी खूश असल्याच पाहिलं आहे, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांना लगावला.

काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटील यांची बाजू घेतली की, त्यांची ठाचली हे लक्षात आलेले नाही, असंहीआमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

Maharashtra Winter Session: जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करणार?; सत्ताधाऱ्यांची बैठक सुरू

'मी गेल्या दहा वर्षापासून जयंत पाटील यांना नडत आहे, ते माझ काहीही वाईट करु शकलेले नाहीत, असंही पडळकर म्हणाले. 

काल सभागृह नेमकं काय घडलं?

काल सभागृहात दिशा सालियन प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली, यावेळी दालनात विरोधकांना बोलू देत नसल्याचा आरोप विरोधी पक्षातील सदस्यांनी केला. यावेळी विरोधी पक्षातील सदस्य दालनात उतरले, आणि गोंधळ सुरू झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्याचा आरोप सत्ताधारी गटातील सदस्यांनी केला आहे.

विधानसभेत गाजला AU मुद्दा! 

एकीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा उल्लेख करत थेट ठाकरे गटावर हल्ला चढवला. तर दुसरीकडे आता हिवाळी अधिवेशनात भाजपा-शिंदे गटाने दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा चर्चेत आणत आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भाजपाचे नितेश राणे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी आक्रमक पवित्रा घेतला. 

Web Title: Maharashtra Winter Session Ajit Pawar happy after Jayant Patil's suspension Gopichand Padalkar criticized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.