मुंबई लोकलमध्ये पठ्ठ्या चक्क डोळ्यावर मास्क लावून झोपला, व्हायरल फोटोवर मंत्री म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 04:41 PM2021-02-26T16:41:44+5:302021-02-26T16:42:35+5:30

Mumbai Local Viral Photo: मुंबईच्या लोकलमध्ये तर एका पठ्ठ्यानं मास्क चक्क डोळ्यावर ठेवून झोप काढली.

man keeps mask on his eyes while travelling in mumbai local photo gone viral | मुंबई लोकलमध्ये पठ्ठ्या चक्क डोळ्यावर मास्क लावून झोपला, व्हायरल फोटोवर मंत्री म्हणाले...

मुंबई लोकलमध्ये पठ्ठ्या चक्क डोळ्यावर मास्क लावून झोपला, व्हायरल फोटोवर मंत्री म्हणाले...

googlenewsNext

महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना (Covid-19) रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होत आहे. त्यात गेल्या दोन दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांचा आकडा ८ हजारांच्या वर गेल्याचं पाहायला मिळत आहे. अशात राज्याचे मुख्यमंत्री असोत किंवा मग स्थानिक प्रशासन सर्वच पातळीवर नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. तरीही लोक अजूनही मास्कबाबत गंभीर नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राज्यात मास्क घालणं बंधनकार असूनही अनेक जण मास्क नाकाच्या खाली किंवा हनुवटीवर मास्क ठेवतात. (man keeps mask on his eyes while travelling in mumbai local, photo gone viral)

मुंबईच्या लोकलमध्ये तर एका पठ्ठ्यानं मास्क चक्क डोळ्यावर ठेवून झोप काढली. याचा फोटो कुणीतरी कॅमेरात टिपला आणि तो फोटो आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. डोळ्यावर मास्क लावून लोकलमध्ये झोपलेल्या या प्रवाशाचा फोटो युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विट केला आहे. काय चूक आहे त्या बिचाऱ्या कोरोना व्हायरसची? अशा उपरोधिक मथळ्यासह सत्यजीत तांबे यांनी फोटो ट्विट केला आहे. त्यानंतर तांबे यांचं हेच ट्विट राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रिट्विट केलं आहे. 

"मित्रांनो असं बेजबाबदारपणे वागू नका!, मास्कचा योग्य वापर करा, कमीत कमी स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याकरिता", असं वडेट्टीवार यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. 

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर- वडेट्टीवार
"राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्ये चिंतेची बाब आहे. सरकारकडून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. उपाययोजना जरी सुरू असल्या तरी त्याचा रिझल्ट काय होईल हे आपल्याला सांगता येणं कठीण आहे. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे", असा सूचक इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. ते नागपुरात बोलत होते. 

मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याचा विचार 
मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत असल्यानं लोकलमध्ये गर्दी कशी कमी होईल याबाबत विचार सुरू आहे. तसेच लोकलच्या फेऱ्या कमी करण्याचाही विचार केला जात असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहे. 

Read in English

Web Title: man keeps mask on his eyes while travelling in mumbai local photo gone viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.