'काँग्रेस आघाडीने मुस्लिमांना दिलेले आरक्षण फडणवीस सरकारमुळे खोळंबले, एमआयएम -भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू' नसीम खान यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 05:03 PM2021-12-12T17:03:11+5:302021-12-12T17:03:47+5:30

Naseem Khan News: काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात ५ टक्के आरक्षण दिले होते. या निर्णयास मुंबई हाय कोर्टानेही मान्यता दिली होती परंतु त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही.

MIM-BJP two sides of the same coin, Congress leader Naseem Khan criticizes | 'काँग्रेस आघाडीने मुस्लिमांना दिलेले आरक्षण फडणवीस सरकारमुळे खोळंबले, एमआयएम -भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू' नसीम खान यांची टीका

'काँग्रेस आघाडीने मुस्लिमांना दिलेले आरक्षण फडणवीस सरकारमुळे खोळंबले, एमआयएम -भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू' नसीम खान यांची टीका

Next

मुंबई - काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात ५ टक्के आरक्षण दिले होते. या निर्णयास मुंबई हाय कोर्टानेही मान्यता दिली होती परंतु त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असताना एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते परंतु पाच वर्षे हे आमदार मुस्लीम आरक्षणावर गप्प का बसले? फडणवीस सरकारला कधीही जाब का विचारला नाही? असा घणाघाती आरोप माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरीफ मोहम्मद नसीम खान यांनी केला आहे.

एमआयएमच्या असादुद्दीन औवेसी यांचा समाचार घेताना नसीम खान म्हणाले की, मी अल्पसंख्याक मंत्री असताना मराठा समाजाबरोबरच मुस्लीम समाजालाही आघाडी सरकारने आरक्षण दिले होते. परंतु त्यानंतर भाजपा सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. पाच वर्ष काँग्रेस पक्ष मुस्लीम आरक्षणासाठी फडणवीस सरकारशी संघर्ष करत होता त्यावेळी एमआयएमने या आरक्षणाबद्दल तोंडातून एक शब्द काढला नाही. उलट एमआयएमच्या दोन्ही आमदारांनी मुस्लिमांना आरक्षण न देणा-या फडणवीस सरकारची सातत्याने मदतच केली. निवडणूक आल्यावरच एमआयएमला मुस्लीम आरक्षण आठवते, निवडणुक संपली की यांना आरक्षण आठवत नाही, असा टोलाही नसीम खान यांनी लगावला. भाजपा व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे नसीम खान म्हणाले.

मुस्लीम समाजाच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच आग्रही राहिला आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’चा नारा देणाऱ्या परंतु समाजात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करुन सत्तेचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला एमआयएम साथ देत असते. एमआयएमला राज्यातील मुस्लीम समाज थारा देत नाही. एमआयएमची भूमिका ही नेहमीच भाजपाला अनुकुल राहिली आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, येथे येऊन औवेसींनी मुस्लीम समाजाला भडकावण्याचे प्रयत्न करुन नयेत. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबध्द आहे. मुंबई महानगरपालिका आणि राज्यभरातील  नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर ओवेसींना मुस्लीमांचा विकास आणि आरक्षण आठवले. आरक्षणावरून आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या असदुद्दीन औवेसी यांनी व त्याच्या एमआयएम पक्षाने मुस्लीम समाजासाठी काय केले ? या हिशोब द्यावा असा सवाल करून महाराष्ट्रातील मुस्लीम समाज सुज्ञ असून एमआयएमला पुरता ओळखून आहे त्यांना थारा देणार नाही, असेही नसीम खान म्हणाले.

Web Title: MIM-BJP two sides of the same coin, Congress leader Naseem Khan criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.