आमदार अपात्रता प्रकरण: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 06:12 AM2023-10-26T06:12:58+5:302023-10-26T06:14:31+5:30
दोन्ही बाजूंकडील कागदपत्रे तपासून विधानसभा अध्यक्ष सुनावणीत काय निर्णय घेतात, याकडे दोन्ही गटांचे लक्ष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी गुरुवारी दुपारी ४ वाजता होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश ठाकरे गटाला दिले होते. ती सादर करण्यात आली.
मागील सुनावणीत ३४ याचिका सहा गटांत एकत्रित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, ठाकरे गटाकडूनही सर्व कागदपत्रे सादर करण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रताेद सुनील प्रभू यांनी दिली. आता दोन्ही बाजूंकडील कागदपत्रे तपासून विधानसभा अध्यक्ष सुनावणीत काय निर्णय घेतात, याकडे दोन्ही गटांचे लक्ष आहे.