Maharashtra Politics: “राहुल गांधींच्या विधानाला काँग्रेस आमदारांचा पाठिंबा आहे का?”; विधानसभेत सत्ताधारी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 02:26 PM2023-03-23T14:26:45+5:302023-03-23T14:26:58+5:30

Maharashtra News: काँग्रेसने दहशतवादी अजमल कसाबचा उदो उदो केला, त्याला बिर्याणी चारली, अशी टीका करत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली.

mla sanjay shirsat and ashish shelar demand that congress rahul gandhi should apologise over veer savarkar statement in maharashtra budget session | Maharashtra Politics: “राहुल गांधींच्या विधानाला काँग्रेस आमदारांचा पाठिंबा आहे का?”; विधानसभेत सत्ताधारी आक्रमक

Maharashtra Politics: “राहुल गांधींच्या विधानाला काँग्रेस आमदारांचा पाठिंबा आहे का?”; विधानसभेत सत्ताधारी आक्रमक

googlenewsNext

Maharashtra Politics: राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानाचे पडसाद विधानसभेत उमटले. यावरून सत्ताधारी आक्रमक झाले आणि राहुल गांधी यांनी यावरून माफी मागितली पाहिजे, अशी मागणी लावून धरली. यातच गोंधळाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा गोंधळ रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी आमदार थांबले नाहीत. अखेर १० मिनिटांसाठी विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. 

सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही यावेळी राहुल गांधी यांच्याविरोधात ठराव मांडू इच्छितो, त्याला परवानगी द्या, अशी विनंती शिवसेना शिंदे गटाचे सदस्य संजय शिरसाट यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्ष काही बोलणार इतक्यात आमदार आशिष शेलार यांनी माफीची मागणी लावून धरली. परिणामी विधासभेत मोठा गोंधळ झाला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले. 

राहुल गांधींच्या विधानाला काँग्रेस आमदारांचा पाठिंबा आहे का?

या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पाडले होते. ही तीच काँग्रेस आहे. आमच्या काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांनी आणि काँग्रेस आमदारांनी सांगावे की, राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याला तुमचा पाठिंबा आहे का? सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्याबद्दलचे असे वक्तव्य आम्ही ऐकून घेणार नाही. या काँग्रेसने दहशतवादी अजमल कसाबचा उदो उदो केला, त्याला बिर्याणी चारली. त्यांचा राहुल गांधींच्या वक्तव्याला पाठिंबा असेल तर त्याने आम्हाला काही फरक पडत नाही, असे संजय शिरसाट म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: mla sanjay shirsat and ashish shelar demand that congress rahul gandhi should apologise over veer savarkar statement in maharashtra budget session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.