“एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?”; मनसेची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 03:28 PM2021-09-08T15:28:00+5:302021-09-08T15:29:44+5:30

पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

mns santosh dhuri criticized shiv sena and maha vikas aghadi govt over expenses for penguins | “एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?”; मनसेची विचारणा

“एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?”; मनसेची विचारणा

Next
ठळक मुद्देमनसेकडून मुंबईतील वरळीसह काही भागांमध्ये पोस्टरबाजीपेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या निविदेवरून टीकाशिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला टोला

मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात सन २०१७ मध्ये दक्षिण कोरियातून हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी विशेष वातानाकुलित कक्ष व पेंग्विन खरेदीसाठी एकूण २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर तीन वर्षांच्या देखभालीसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. यातच आता मनसेनेमुंबईतील काही ठिकाणी पोस्टर लावत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी, असा खोचक सवाल करण्यात आला आहे. (mns santosh dhuri criticized shiv sena and maha vikas aghadi govt over expenses for penguins)

“काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का?”; भाजपचा शिवसेनेवर पलटवार

पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला मात्र महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनेच आता आक्षेप घेतला आहे. तसेच विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही विरोध केला आहे. हा खर्च अवाजवी असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. यातच आता मनसेकडून मुंबईतील वरळीसह काही भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आली आहेत. हा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी आहे, असा टोलाही मनसेने लगावला आहे. मनसैनिक संतोष धुरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केले आहे.

राष्ट्रवादीचा आरोप म्हणजे ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’ असा प्रकार; भाजपचा पलटवार

पेंग्विन देखभालीसाठी होणारा खर्च कायमच वादाचा मुद्दा

पेंग्विनच्या देखभालीसाठी होणारा खर्च हा कायमच वादाचा मुद्दा राहिला आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाचा आर्थिक भार आणि उत्पन्नात घट यामुळे मुंबई महापालिकेचे आर्थिक गणित बिघडले आहेत. या परिस्थितीत राणी बागेतील पेंग्विनच्या देखभालीसाठी तीन वर्षांत १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र सर्वत्र आर्थिक मंदी असताना या कंत्राटाच्या किंमतीमध्ये ५० टक्के वाढ कशी? असा सवाल उपस्थित करीत हे कंत्राट रद्द करण्याची मागणी काँग्रेस आणि भाजपने आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

“सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल

केवळ ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठीच या निविदा 

पेंग्विन पक्षांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी राणीबागेत तज्ञ पशु वैद्यकीय अधिकारी आहेत. तर पेंग्विन कक्षाच्या देखभालीसाठी महापालिकेचे अभियंता व कर्मचारी उपलब्ध आहेत. अशावेळी केवळ ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठीच या निविदा काढण्यात आल्या असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा आणि भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

“शेतकरी थकतील हा केंद्रातील मोदी सरकारचा गैरसमज”; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

दरम्यान, पेंग्विन हे उद्यानाचे आकर्षण आहे. पेंग्विन वेगळ्या वातावरणात राहतात. त्यांची काळजी घेण्यास तडजोड केल्यास त्यांच्या जिवाशी खेळण्या सारखे होईल. तेव्हा कोणतीही तडजोड होणार नाही. विरोधकांना खर्चावर आक्षेप असेल तर त्याची माहिती घेऊ. परंतु प्राणी संग्रहालयाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
 

Web Title: mns santosh dhuri criticized shiv sena and maha vikas aghadi govt over expenses for penguins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.