'नात्यांमधील ओलावा आणि राजकीय...'; शरद पवार-अजित पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 01:58 PM2023-08-15T13:58:52+5:302023-08-15T13:59:43+5:30

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

Moisture in relationships and the political Supriya Sule's reaction to Sharad Pawar-Ajit Pawar's meeting | 'नात्यांमधील ओलावा आणि राजकीय...'; शरद पवार-अजित पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रीया

'नात्यांमधील ओलावा आणि राजकीय...'; शरद पवार-अजित पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रीया

googlenewsNext

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. दोघेही शनिवारी दिवसभर पुण्यात होते. त्यामुळे या चर्चेला पुष्टी मिळत होती. जयंत पाटील हेही यावेळी उपस्थित होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. या चर्चांवर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

'मी लपून गेलेलो...'; शरद पवारांसोबतच्या गुप्त बैठकीवर अजित पवार संतापले, म्हणाले...

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, नात्यांमधील ओलावा आणि राजकीय धोरण यात कोणीही गल्लत करु नये. राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये कोणताही वाद झालेला नाही, मी स्वत: काँग्रेस आणि शिवसेनेशी बोलले आहे. इतरांनी चिंता करु नये, असंही सुळे म्हणाल्या. 

"सांगोल्यात काल तुम्ही सर्वांनी कार्यक्रम पाहिला असेल. यात तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. त्यामुळे चिंता नसावी. सर्व गोष्टी क्लिअर आहेत, कालची सभा आणि पवार साहेबांची पत्रकार परिषद यावरुन वाटतंय काही संभ्रम नसेल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

अजित पवार यांनीही दिली प्रतिक्रीया 

उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांना गुप्त भेटीच्या चर्चेवर माहिती दिली. अजित पवार म्हणाले, मी बैठकीला लपून गेलेलो नाही, मी उघड फिरणारा कार्यकर्ता आहे. मी उद्या कोणाच्याही घरी गेलो तरी कधी बाहेर पडायचं हे मी ठरवणार, असं स्पष्ट अजित पवार यांनी सांगितले. 

"उद्योगपती अतुल चोरडीया यांचे वडील शरद पवार यांचे क्लासमेंट होते. त्या दिवशी पवार साहेब व्हीएसआयचा कार्यक्रम संपवून येणार होते. मी चांदणी चौकातील कार्यक्रम संपवून येणार होतो. त्या दिवशी शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही होते.  चोरडीया यांनी आम्हाला जेवायला बोलावलं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो होते, असंही अजित पवार म्हणाले.  

अजित पवारम्हणाले, पुण्यातील भेटीला कोणीही वेगळं वळण देऊ नये. आम्ही नात्यातील आहे अशा भेटी होतं राहणार त्यामुळे या संदर्भात संभ्रम निर्माण करु नका. राज्यात दरवर्षी जसा पाऊस पडतो तसा यावेळी पडलेला नाही. काही ठिकाणी धरण भरली आहेत, अजुनही काही ठिकाणी टँकरने पाणी द्यावं लागतं. राज्यातील ७५ वर्षावरील वृद्धांना एसटीने प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरात हद्दवाढ होणे खूप गरजेचे आहे, हद्दवाढ संदर्भात काहीजण चुकीची माहिती पसरवत आहेत.हद्दवाढ करण्याच्या विरोधात असणाऱ्यांनी देखील याला सहकार्य करणे गरजेचे आहे. पुढील ५० वर्षाचा विचार करून आपल्याला सर्व नियोजन करावे लागेल, असंही पवार म्हणाले. 

Web Title: Moisture in relationships and the political Supriya Sule's reaction to Sharad Pawar-Ajit Pawar's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.