Maharashtra Assembly's Monsoon Session 2024 अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी; शिंदे-फडणवीसांच्या एंट्रीवेळी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 01:25 PM2024-06-27T13:25:08+5:302024-06-27T15:20:06+5:30

Maharashtra Assembly's Monsoon Session, Pawasali Adhiveshan 2024 विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पळपुटे सरकार असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

Monsoon Session 2024 the opposition raised slogans During the entry of eknath Shinde devendra Fadnavis | Maharashtra Assembly's Monsoon Session 2024 अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी; शिंदे-फडणवीसांच्या एंट्रीवेळी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

Maharashtra Assembly's Monsoon Session 2024 अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी; शिंदे-फडणवीसांच्या एंट्रीवेळी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 ( Marathi News ) : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या या अधिवेशनात विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळ परिसरात दाखल झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला.

काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पळपुटे सरकार असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. वडेट्टीवार यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांची वीज बिल माफ व्हावी यासाठी महाविकास आघाडीतील सर्व आमदारांनी आज विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले." 

दरम्यान, "राज्यातील  बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पीकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच संपूर्ण वीजबील माफी करावी," अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

अधिवेशनाचे राजकीय महत्त्व

लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूनीवर विधिमंडळाचे हे पावसाळी अधिवेशन होत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडीने भरघोस यश मिळवल्याने आता हे अधिवेशन खास असणार आहे. तसेच राज्य सरकार २८ जून रोजी २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Monsoon Session 2024 the opposition raised slogans During the entry of eknath Shinde devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.