मुंबई काँग्रेसची महाजम्बो कार्यकारिणी जाहीर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व गटांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 06:04 AM2021-03-15T06:04:17+5:302021-03-15T06:55:21+5:30

गेल्यावर्षी १९ डिसेंबरला आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत चरणसिंग सप्रा यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले गेले. याशिवाय, एक प्रभारी, चार समित्या आणि नऊ सदस्यांची नियुक्ती करत सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग सुरू झाला.

Mumbai Congress announces Mahajambo executive, opportunity for all groups on the backdrop of elections | मुंबई काँग्रेसची महाजम्बो कार्यकारिणी जाहीर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व गटांना संधी

मुंबई काँग्रेसची महाजम्बो कार्यकारिणी जाहीर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व गटांना संधी

googlenewsNext

मुंबई : महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मुंबई काँग्रेसच्या नव्या महाजम्बो कार्यकारिणीची रविवारी घोषणा करण्यात आली. सहा ज्येष्ठ उपाध्यक्ष, १५ उपाध्यक्ष, ४२ महासचिव, ७६ सचिव आणि ३० कार्यकारी सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील सर्वच गटांना काही ना काही मिळेल, याची दक्षता यानिमित्ताने घेतली गेली आहे.

गेल्यावर्षी १९ डिसेंबरला आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत चरणसिंग सप्रा यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले गेले. याशिवाय, एक प्रभारी, चार समित्या आणि नऊ सदस्यांची नियुक्ती करत सामूहिक नेतृत्वाचा प्रयोग सुरू झाला. नव्या अध्यक्षांच्या कार्यकारिणीची आज दिल्लीतून घोषणा झाली. काँग्रेस कार्याध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुंबई काँग्रेस कार्यकारिणी आणि जिल्हा समित्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे सांगत महासचिव के. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. जाहीर झालेल्या नव्या कार्यकारिणीत सर्वच गटांना सामावून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. सहा ज्येष्ठ उपाध्यक्ष, १५ उपाध्यक्ष, ४२ महासचिव, ७६ सचिव आणि ३० कार्यकारी सदस्यांसोबतच जिल्हा काँग्रेस कमिटीतील नावेही जाहीर करण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्हा अर्थात मुंबईतील लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील या सहा समित्यांमध्ये  एक अध्यक्ष आणि दोन कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. एकीकडे सर्वच गटांना, नेत्यांना सामावून घेताना मोठ्या प्रमाणावर पदे वाटली गेली आहेत.

आघाड्या आणि फ्रंटलच्या प्रमुखांची घोषणा बाकी
माजी आमदार मधू चव्हाण आणि बाबा सिद्दीकी यांच्यासह विरेंद्र बक्षी, जेनेट डिसूझा, गणेश यादव, शिवजी सिंग यांच्याकडे ज्येष्ठ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यांच्या जोडीला १५ उपाध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. अद्याप विविध आघाड्या आणि फ्रंटलच्या प्रमुखांची घोषणा बाकी आहे
 

 

Web Title: Mumbai Congress announces Mahajambo executive, opportunity for all groups on the backdrop of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.