मुंबई काँग्रेसचा सावळा गोंधळ, परस्पर आयोजित केली पत्रपरिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 06:32 AM2018-06-14T06:32:30+5:302018-06-14T06:32:30+5:30
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची कोणतीही परवानगी न घेता मुंबई काँग्रेसने परस्पर त्यांची पत्रकार परिषद आयोजित केल्याने अवघ्या अडीच मिनिटांत ती आटोपण्यात आली.
मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची कोणतीही परवानगी न घेता मुंबई काँग्रेसने परस्पर त्यांची पत्रकार परिषद आयोजित केल्याने अवघ्या अडीच मिनिटांत ती आटोपण्यात आली.
बुधवारी सकाळी ८.३० वाजता राहुल गांधी यांची पत्रकार परिषद असल्याचा निरोप गुरुवारी रात्री मिळाल्यामुळे माध्यमांचे प्रतिनिधी सकाळीच ‘एमसीए’त दाखल झाले. वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅनही लागल्या. एवढे पत्रकार बघून गोंधळून गेलेल्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष
संजय निरुपम यांनी सारवासारव करत राहुल गांधींना माध्यमांशी बोलण्यास राजी केले. त्यानुसार अवघे अडीच मिनिटे बोलून राहुल गांधींनी आयोजित करण्यात आलेली ही पत्रकार परिषद आटोपती घेतली.
मुंबई काँग्रेसमधील विसंवादामुळे हा प्रकार घडल्याचे समजते. निरुपम यांनी या गोंधळाची जबाबदारी काँग्रेसच्या मीडिया समन्वयकावर टाकून या प्रकरणी आपले हात झटकले आहेत. मात्र या प्रकारामुळे प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाच्या राष्टÑीय अध्यक्षाच्या कार्यक्रमाविषयी जर हा निष्काळजीपणा करण्यात येत असेल तर बाकीच्या कार्यक्रमांच्या बाबतीत काय बोलणार?
मुंबई काँग्रेस कधीही प्रदेश काँग्रेसला विश्वासात घेत नाही,
असा तक्रारीचा सूरही त्यांनी
लावला.