"बाळासाहेब ठाकरेंचे वारस सांगणाऱ्यांनी काँग्रेसला मतदान करणं म्हणजे..."; एकनाथ शिंदेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 01:53 PM2024-05-20T13:53:04+5:302024-05-20T13:54:24+5:30

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Mumbai Lok Sabha Election 2024: "बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला जवळ करू नका सांगितले, पण आज ठाकरे गट काँग्रेसला अभिमानाने मतदान करत आहे"

Mumbai Lok Sabha Election 2024 Eknath Shinde slams Uddhav Thackeray for voting congress against Balasaheb Thackeray ideology | "बाळासाहेब ठाकरेंचे वारस सांगणाऱ्यांनी काँग्रेसला मतदान करणं म्हणजे..."; एकनाथ शिंदेंचा घणाघात

"बाळासाहेब ठाकरेंचे वारस सांगणाऱ्यांनी काँग्रेसला मतदान करणं म्हणजे..."; एकनाथ शिंदेंचा घणाघात

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Mumbai Lok Sabha Election 2024:  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशातील ८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ४९ मतदारसंघात आज मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघ असून त्यातील ६ मतदारसंघ मुंबईतील आहेत. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अखेरचा टप्पा असून यात बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते बड्या नेतेमंडळींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी मुंबईत उद्धव ठाकरे यांनी मतदान केले. तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान केले. यंदा उद्धव ठाकरे यांनी मविआच्या अधिकृत उमेदवार वर्षा गायकवाड यांना मत देण्याची घोषणा आधी केली होती. याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर घणाघाती टीका केली.

"बाळासाहेब ठाकरे यांनी कांग्रेसला धडा शिकवला, काँग्रेसला जवळ करू नका असे आयुष्यभर सांगितले. पण आज त्याच बाळासाहेबांचे वारस सांगणाऱ्यांनी काँग्रेसला अभिमानाने मतदान केले. बाळासाहेबांनी काँग्रेसला कायम विरोध केला पण आज उबाठा गट काँग्रेसला मतदान करत आहे. हा शिवसेनेच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील काळा दिवस आहे. पण मला विश्वास आहे की बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सच्चा शिवसैनिक काँग्रेसला कधीही मतदान करणार नाही," असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर केला.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रात शेवटचा टप्पा आहे. सकाळपासून मतदार हक्क बजावण्यासाठी उतरले आहेत. सर्वांनी लोकशाहीसाठी मतदानात सहभागी व्हावे. देशाच्या विकासाची ही निवडणूक आहे. या देशात पुन्हा एकदा नेतृत्व करण्याकरता नरेंद्र मोदी यांची लोक आतुरतेने वाट पहात आहेत. 

"बोगस मतदार आणण्याची आम्हाला गरज नाही. हा दिघेंचा बालेकिल्ला आहे. इथे मतदार सज्जन आणि सुसंस्कृत आहेत. मी आताच कलेक्टर यांना संपर्क केला. योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे लोक वक्तव्य करतात त्यांनी हत्यारे टाकली आहेत. फतवे काढण्याचा प्रकार प्रथमच पाहायला मिळाला आहे. अश्या प्रकारची वक्तव्ये आणि वर्तणूक घातक आहे. आम्ही विकास घेऊन पुढे जात आहोत. विकास सर्वांनाच मिळणार. जातीत तेढ निर्माण करण्याचे जे प्रयत्न करत आहेत, त्यांना या निवडणुकीत लोक घरचा रस्ता दाखवतील" असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

Web Title: Mumbai Lok Sabha Election 2024 Eknath Shinde slams Uddhav Thackeray for voting congress against Balasaheb Thackeray ideology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.