'त्या' Phone Call बाबत धनंजय मुंडे म्हणाले, 'माझा बंगला म्हणजे बस स्टँड'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 09:06 PM2019-11-25T21:06:59+5:302019-11-25T21:24:51+5:30

'अजित पवारांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे'

My bungalow is a bus stand - Dhananjay Munde | 'त्या' Phone Call बाबत धनंजय मुंडे म्हणाले, 'माझा बंगला म्हणजे बस स्टँड'

'त्या' Phone Call बाबत धनंजय मुंडे म्हणाले, 'माझा बंगला म्हणजे बस स्टँड'

Next

मुंबई : : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच, तिन्ही पक्षाच्या आमदारांनी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्र येऊन शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांच्या शपथविधीच्यावेळी 11 आमदार उपस्थित होते. त्यामध्ये धनंजय मुंडे आघाडीवर होते, असे सांगण्यात येते होते. मात्र, धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. 

मी राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. अजित पवारांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे. पण, माझी अंतिम निष्ठा पक्षाबद्दल आणि शरद पवार यांच्याबद्दलच आहे. मी त्यादिवशी बैठकीला उशिरा पोहोचलो हे मी मान्य करतो. मला याबाबतची काहीच माहिती नव्हती. कारण, त्यादिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत मी झोपलेलोच होतो, असे म्हणत अजित पवारांनी ठरवून केलेल्या राजकीय घडामोडींशी माझा काहीही संबंध नसल्याचे धनंजय मुंडेंनी सांगितले.

याचबरोबर, अजित पवारांच्या शपथविधीसाठी आमदारांना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरुन फोन गेला होता. याविषयी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, "माझ्या बंगल्यावरुन जरी आमदारांना फोन गेले असले तरी, मी त्यादिवशी बंगल्यावर गेलोच नाही. माझ्या बंगल्यावर काय झाले हे मला माहीत नाही, तो सार्वजनिक आहे. माझा बंगला म्हणजे बस स्टँड असतो. मला याबद्दल काही माहीत नव्हते. माध्यमांनी लोकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत." 

दरम्यान, अजित पवार यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत शनिवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शपथविधीच्या वेळी 11 आमदार उपस्थित होते. त्यामध्ये धनंजय मुंडे आघाडीवर होते, असे बोलले जाते. परंतु, अजित पवारांसोबतचे जवळ-जवळ 9-10 आमदार हे शरद पवार यांच्याकडे परतले आहेत. तर धनंजय मुंडे संपूर्ण दिवसभर नॉट रिचेबल होते. त्यामुळे ते अजित पवारांसोबत आहेत अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित झाले होते. त्यानंतर, आज पुन्हा धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिले आहे. 
 

Web Title: My bungalow is a bus stand - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.