'वेड्यांच्या सरकारकडून राज्यात लूट सुरू'; नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 01:49 PM2023-08-20T13:49:44+5:302023-08-20T13:51:59+5:30

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप केला. 

Nana Patole criticized the Shinde-Fadnavis government | 'वेड्यांच्या सरकारकडून राज्यात लूट सुरू'; नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

'वेड्यांच्या सरकारकडून राज्यात लूट सुरू'; नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई- राज्य सरकारमुळे राज्यातील जनतेचं नुकसान होत आहे. एसटी महामंडळात या सरकारने पाच हजार बसेस खासगी व्यक्तीकडून घेण्याचा निर्णय घेतला. एकाच टेंडरला त्यांनी ही संधी दिली आहे, त्या टेंडरमध्ये या सरकारने जास्त पैसे मोजले आहेत. जनतेची लूट करण्याच काम या सरकारने चालवले आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. 

राष्ट्रवादीचा आणखी एक नेता जामिनावर बाहेर, 8 वर्षांपासून तुरुंगात होते माजी आमदार...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भ्रष्टाचार कसा करायचा, जनतेची लूट कशी करायची हे सरकार पाहत आहे. जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. अशी अनेक प्रकरणं आमच्याकडे आहेत. आम्ही थोड्याच दिवसाच यावर आवाज उठवणार आहे, ईडीचे सरकार आता वेड्यांच सरकार झालं आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला. 

"राहुल गांधींनी मांडलेला मुद्दा बरोबर आहे, आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. प्रत्येक स्तरावर महाराष्ट्रातील सरकार फेल झालं आहे. राज्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे, असंही पटोले म्हणाले. 

महाराष्ट्रातील भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपला मतदान करून आपण स्वत:च्या पायावर गोळी झाडली आहे, हे आता जनतेच्या लक्षात येत आहे. जनता आता भाजपला संधी देणार नाही. अट अशी आहे की तुम्ही ज्या बोटाने भाजपला मतदान केले ते बोट कापले आहे. जनतेला खोटी स्वप्ने दाखवून भाजप २०१४ मध्ये सत्तेवर आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

भाजपचा खरा चेहरा आता समोर आला आहे. मतदानानंतर जनता पश्चाताप करत आहे. 'एक चूक, कमळ फुलले' म्हणून लोक मनातल्या मनात पश्चाताप करत आहेत, असा आरोपही पटोले यांनी केला. 

Web Title: Nana Patole criticized the Shinde-Fadnavis government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.