UP Election 2022: महिलांना संधी, सन्मान देण्याची काँग्रेसची परंपरा, ४० टक्के उमेदवारीचा निर्णय क्रांतीकारी: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 05:42 PM2021-10-19T17:42:23+5:302021-10-19T17:43:22+5:30

UP Election 2022: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.

nana patole welcomed decision of congress to give tickets 40 percent women in up election 2022 | UP Election 2022: महिलांना संधी, सन्मान देण्याची काँग्रेसची परंपरा, ४० टक्के उमेदवारीचा निर्णय क्रांतीकारी: नाना पटोले

UP Election 2022: महिलांना संधी, सन्मान देण्याची काँग्रेसची परंपरा, ४० टक्के उमेदवारीचा निर्णय क्रांतीकारी: नाना पटोले

Next

मुंबई: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (Congress) सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची घोषणा ही महिलांना समान संधी व सन्मान देण्यासाठी टाकलेले क्रांतीकारी पाऊल आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्व समाज घटकांना न्याय देणारा पक्ष आहे. महिलांना समान संधी देण्यासाठी काँग्रेस पक्षाने यापूर्वीही अनेक महत्वाचे निर्णय घेऊन त्याची यशस्वीपणे अंमलबजावणीही केलेली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यातही महिलांना सहभागी करून घेतले होते. पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन महिलांना राजकारणात मोठी संधी उपलब्ध करुन दिली. महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने हेच आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत केले. संरक्षण दलात महिलांना संधी देण्याचा निर्णयही राजीव गांधी यांनीच घेतला. महिला व मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देण्याचा निर्णयही काँग्रेसच्या सरकारनेच घेतला आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

राजकारणात महत्वाची संधी देण्याचे पाऊल

देशाला पहिल्या महिला पंतप्रधानपदाचा मान इंदिराजी गांधी यांच्या रुपाने काँग्रेसने दिला तसेच पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने देऊन जगासमोर एक आदर्श घालून दिला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊन काँग्रेस पक्षाने महिलांना राजकारणात आणखी महत्वाची संधी देण्याचे पाऊल उचचले आहे, या निर्णयाबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांचे आभारही प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी मानले.

दरम्यान, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ४० टक्के महिला उमेदवारांना तिकीट दिले जाईल. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ही घोषणा केली.
 

Web Title: nana patole welcomed decision of congress to give tickets 40 percent women in up election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.