कंगनाच्या सुरात सूर मिसळणाऱ्या राम कदमांची नार्को टेस्ट करा, काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 09:34 AM2020-09-04T09:34:17+5:302020-09-04T09:34:29+5:30

राम कदमांना आता काँग्रेसनं लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राम कदमांवर गंभीर आरोप केले आहेत. 

Narco test of BJP leader Ram Kadam, demand of Congress | कंगनाच्या सुरात सूर मिसळणाऱ्या राम कदमांची नार्को टेस्ट करा, काँग्रेसची मागणी

कंगनाच्या सुरात सूर मिसळणाऱ्या राम कदमांची नार्को टेस्ट करा, काँग्रेसची मागणी

Next

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांवरही अविश्वास व्यक्त केला. त्याचा संजय राऊतांनी चांगलाच समाचारही घेतला होता. यावर भाजपाचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला. त्याच राम कदमांना आता काँग्रेसनं लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राम कदमांवर गंभीर आरोप केले आहेत. 

सचिन सावंत यांनी ट्विट करत  भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. ट्विटमध्ये ते लिहितात, म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आपल्या मुंबईवर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे, असं सचिन सावंत म्हणाले आहेत. विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग्ज विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील.

महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपाने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, ही आमची मागणी आहे.

मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात जावं. हा काय तमाशा चाललंय, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर तातडीने उत्तर दिलं पाहिजे, मग ते कोणीही असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले होते.

मला अनफॉलो का केलं जातंय?- कंगना रणौत
माझे ट्विटर फॉलोअर्स गेल्या दिवसांत अचानक कमी होत आहेत. यामध्ये एक पॅटर्न असल्याचा संशय मला येतोय. दिवसाला 40 ते 50 हजार फॉलोअर्स कमी होत आहेत. मी ट्विटरवर नवीन आहे. यामागचे कारण मला माहित नाही. हे असे का होतेय कोणी सांगेल का? ते असे का करत आहेत, काही कल्पना आहे का? अशा आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे. या ट्विटमध्ये तिने ट्विटर इंडियाला देखील टॅग केले आहे.  

Read in English

Web Title: Narco test of BJP leader Ram Kadam, demand of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.