Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 07:52 PM2024-06-10T19:52:50+5:302024-06-10T19:53:28+5:30

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलताना अजित पवार शरद पवार यांचे नाव घेत भावुक झाले.

ncp 25th anniversary Ajit pawar emotional with Sharad Pawar's name in the anniversary program | Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",

Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",

Ajit Pawar ( Marathi News ) :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच वर्धापन दिन सोहळा आज होत आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटांनी आज वर्धापन साजरा केला. अजित पवार गटाने मुंबई तर शरद पवार गटाने अहमदनगरमध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे. मुंबईतील वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचा उल्लेख करत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.  आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले, शरद पवार साहेबांनी २४ वर्षे पक्षवाढीसाठी मेहनत घेतली, यावेळी पवार भावुक झाले. 

काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीची स्थापना होत असताना सगळ्यांनी कष्ट घेतले. भुजबळ साहेब पायाला भिंगरी बांधून फिरत होते, त्यांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. आज पक्षाला २५ वर्षे पूर्ण होत नसताना काही लोक आपल्याबरोबर नाहीत, याची मला खंत आहे. आर.आर. आबा, बेंडके सर अशा अनेकांचे योगदान होतं. गेली २४ वर्षे शरद पवार साहेबांनी पक्षाचं नेतृत्व केलं, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं सांगत अजित पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. 

लोकसभा निवडणुकाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभेत आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही, तरी चालेल आपण जोमाने लढू. जुलै अखेरीस आपले राज्यसभेत तीन खासदार असतील. लोकसभेत सुनिल तटकरे आहेत, असंही अजित पवार म्हणाले. कापूस, सोयाबीन, कांद्याने रडवले आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात अनेक जागा पडल्या. याला एकमेव कारण म्हणजे कांदा आहे. आता आम्ही यावर बोलत आहे, यावर मार्ग काढत आहे. याचा फटका बसला आहे. दुष्काळी परिस्थिती होती, पण आचारसंहितेत आम्हाला बैठका घेता येत नव्हत्या पण तरीही आम्ही नियोजन लावले होते, असंही अजित पवार म्हणाले. 

"चंद्र, सूर्य असेपर्यंत कोणच संविधान बदलू शकत नाही"

"पिक विमा शेतकऱ्यांना मिळतो का? यासह अन्य प्रश्नांचा आम्ही आढावा घेत आहे. करोडो रुपयांची कामे राज्यात सुरू आहेत. मी पुन्हा सांगतो जरी आपण महायुतीमध्ये असलो तरीही आपण शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा आपण सोडलेली नाही. आपले विरोधक चुकीच्या पद्धतीने नरेटीव्ह सेट केला. मी जाहीरपणे सांगत होतो की, चंद्र, सूर्य असेपर्यंत कोणच संविधान बदलू शकत नाही, असंही अजित पवार म्हणाले. 

Web Title: ncp 25th anniversary Ajit pawar emotional with Sharad Pawar's name in the anniversary program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.