“एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही”; अजित पवारांकडून क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 07:45 PM2022-06-23T19:45:48+5:302022-06-23T19:47:11+5:30

शिवसेनेत जे काही प्रश्न निर्माण झालेत त्याबद्दल शिवसेनेचे नेते, प्रवक्ते अधिकृतपणे बोलतील, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

ncp ajit pawar give clean chit and said bjp is not behind the rebel of shiv sena eknath shinde | “एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही”; अजित पवारांकडून क्लीन चिट

“एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही”; अजित पवारांकडून क्लीन चिट

googlenewsNext

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, प्रथम शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, यावर शिंदे गट ठाम आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे नेते, आमदार, मंत्री, पदाधिकारी यांची एक बैठक मुंबईत घेतली. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत माहिती दिली. 

सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालीय त्यावर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी शेवटपर्यंत राहून हे सरकार कसे टिकेल, यासाठी प्रयत्न करत राहणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेत जे काही प्रश्न निर्माण झालेत त्याबद्दल शिवसेनेचे नेते, प्रवक्ते अधिकृतपणे बोलतील. काही आमदार परत आलेत. नितीन देशमुख, कैलास पाटील यांनी तिथे काय घडले हे सांगितले. गुवाहाटीत जे आमदार आहेत त्यांना आवाहन करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पक्षाची भूमिका महाविकास आघाडी सरकार टिकवण्याची आहे. सर्व आमदार आमच्यासोबत आहोत, असे अजित पवार म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही

एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेनेतील हे तिसरे मोठे बंड आहे. मात्र, अशावेळी शिवसैनिक कायम नेतृत्वाच्या पाठीशी राहतात. शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंड झाले किंवा बडे नेते बाहेर पडले, तेव्हा तेव्हा नेते एकाबाजूला राहतात आणि शिवसैनिक एकाबाजूला राहतात. बंडखोरांना शिवसैनिक योग्य जागा दाखवून दिली. बंडखोरी करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांनी यामागे भाजप असल्याचा दावा महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून आणि शिवसेनेकडून केला जात असल्याबाबत विचारणा केली. यावर बोलताना, एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही, असे सांगत एक प्रकारे अजित पवार यांनी क्लीन चिट दिली.

दरम्यान, तसेच मित्रपक्ष वेगळ्या प्रकारे विधान करत आहेत. सरकार अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आले. ३६ पालकमंत्री नेमले, प्रत्येकाला समसमान वाटप केले. निधीमध्ये कुठेही कपात केली नाही. निधी वाटप सगळ्यांना झाले. मी कधीही दुजाभाव केला नाही. मी सगळ्यांना विकासकामात मदत करण्याची भूमिका माझी असते. मी सकाळी कामाला सुरूवात करून बैठका घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. मविआच्या बैठकीत काही तक्रारी केल्या असत्या तर समज-गैरसमज दूर झाले असते. सध्या महाविकास आघाडी कशी टिकेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रत्युत्तर अजित पवारांनी नाना पटोलेंना दिले आहे. 
 

Web Title: ncp ajit pawar give clean chit and said bjp is not behind the rebel of shiv sena eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.