Maharashtra Political Crisis: विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे; अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 12:49 PM2022-07-04T12:49:02+5:302022-07-04T12:49:44+5:30

NCP Ajit Pawar is now opposition of leader in Vidhan Sabha Party gave letter to speaker of assembly : शिवसेनेतील मोठ्या बंडखोरीमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेतील मोठा पक्ष ठरला आहे.

ncp ajit pawar is now opposition of leader in vidhan sabha party gave letter to speaker of assembly | Maharashtra Political Crisis: विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे; अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

Maharashtra Political Crisis: विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे; अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

Next

मुंबई: विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत एकनाथ शिंदे-भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. आता शिंदे सरकार विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा सामना पाहायला मिळाला. विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटाने बहुमत जिंकले. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मते मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसे पत्र देण्यात आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार Ajit Pawar यांच्या नियुक्तीसाठी अध्यक्षांना पत्र दिले आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत चाचणीचा विश्वासदर्शक जिंकल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार नवे विरोधी पक्षनेते होणार आहेत. 

आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांचा दबदबा 

महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांचा दबदबा होता. उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद अशी दोन्ही महत्वाची पदे अजित पवार यांच्याकडे होती. अजित पवारांचा हाच दबदबा कायम ठेवत ते राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. राज्याच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता खरंतर 'शॅडो मुख्यमंत्री' म्हणून ओळखला जातो. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधातील सर्वांत मोठा पक्ष ठरतो. कारण राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विधानसभेत ५३ आमदार आहेत. तर शिवसेनेचे ५५ आमदार असले तरी बंडखोरीमुळे ३९ आमदारांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे. शिंदे गटाकडून त्यांचा गटच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. अशात विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहे आणि अजित पवार नवे विरोधी पक्षनेते म्हणून आगामी काळात कार्यरत राहणार आहेत. 

दरम्यान, बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला. इतके दिवस उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे संतोष बांगर हेदेखील आता शिंदे गटात सामील झाले. यानंतर शिंदे गटातील आमदारांची संख्या ४० वर पोहोचली. हिंगोली मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आता शिंदे गटात सामील झाले आहे. संतोष बांगर अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या बाजूने होते. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी त्यांनी शिंदे गटाच्या विरोधात मतदान केले होते. पण त्यानंतर ते ट्रायडंट हॉटेलमधून शिंदे गटाच्या बसमध्ये उपस्थित असल्याचे दिसून आले.
 

Web Title: ncp ajit pawar is now opposition of leader in vidhan sabha party gave letter to speaker of assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.