राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला; प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 03:51 PM2023-07-17T15:51:40+5:302023-07-17T15:52:01+5:30

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी काल शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आज सर्व आमदार पवारांच्या भेटीला वायबी चव्हाण सेंटवर आले.

NCP Ajit Pawar, Sharad Pawar, Rebel leader of NCP meets Sharad Pawar again today; Praful Patel said reason | राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला; प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण...

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला; प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण...

googlenewsNext

मुंबई: आजपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे यंदाच्या अधिवेशनात राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी असे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, काल अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नवनियुक्त मंत्र्यांनी वायबी चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आजही अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला वायबी चव्हाण सेंटरवर आले. 

कालप्रमाणे आजही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीचे कारण सांगितले. पटेल म्हणाले की, "आज अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी चव्हाण सेंटरला आलो होतो. कालही अजित पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आणि आम्ही इतर सर्वांनी पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला. काल रविवार असल्यामुळे अनेक आमदार आपापल्या मतदारसंघात होते."

"आज अधिवेशनामुळे सर्व आमदार मुंबईत आले आहेत, त्यामुळे सर्वजण पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो. "कालप्रमाणे आजही आम्ही  सर्वांनी साहेबांना पक्ष एकसंध ठेवण्याची विनंती केली. त्यांनीही कालप्राणे आमचे म्हणणे ऐकून घेतले, पण काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या मनात नेमकं काय आहे, ते मी सांगू शकत नाही. आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही," अशी माहिती प्रफुल्ल पटेलांनी दिली.

Web Title: NCP Ajit Pawar, Sharad Pawar, Rebel leader of NCP meets Sharad Pawar again today; Praful Patel said reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.