"आता तो प्रश्न कशाला..."; पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 10:20 AM2023-01-28T10:20:50+5:302023-01-28T10:21:01+5:30

जयंत पाटील यांच्या विधानावर आता स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

NCP chief Sharad Pawar has reacted to the early morning swearing-in ceremony in Maharashtra. | "आता तो प्रश्न कशाला..."; पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

"आता तो प्रश्न कशाला..."; पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

Next

मुंबई: पहाटेचा शपथविधी ही खेळी असू शकते. त्यामुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यास मदत झाली असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांचीच खेळी असल्याचं म्हटलं जात आहे. 

जयंत पाटील यांच्या या विधानावर आता स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्ष होऊन गेले आहेत. त्यामुळे आता तो प्रश्न कशाला काढायचा, असं शरद पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे. शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानावरही भाष्य केलं आहे. 

आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा केलेली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आम्ही आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत. मात्र, आमची वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी तीन वर्षांपूर्वी राजभवनात झाला होता. शरद पवारांचीही ती खेळी असू शकते. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. पहाटेचा शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कुणी केली असं म्हणता येणार नाही मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठवण्यास मदत झाली. त्या घटनेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी मजबूत झाली असं जयंत पाटील म्हणाले.

काहीही अर्थ नाही - मंत्री चंद्रकांत पाटील 

जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटाला काही अर्थ नाही. तो गौप्यस्फोट त्यावेळी का केले नाहीत. मूळात उशिरा सूचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नाही. संदर्भ नसलेल्या गोष्टी असतात. कुणी काय म्हणाले याला काही अर्थ नाही असं सांगत मंत्री चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. 

Web Title: NCP chief Sharad Pawar has reacted to the early morning swearing-in ceremony in Maharashtra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.