खिल्ली उडवणाऱ्या प्रणिती शिंदेंच्या विधानावर रोहित पवारांची प्रतिक्रिया; उत्तराने जिंकलं सर्वांचं मन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 09:08 AM2023-02-11T09:08:26+5:302023-02-11T09:10:18+5:30
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोण रोहित पवार? मला माहीत नाही; पण हा त्यांचा पहिला टर्म आहे. पोरकटपणा असतो काहीजणांमध्ये...पुढे थोडे दिवस या मॅच्युरिटी येईल त्यांच्यामध्ये...,अशा शब्दांत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी रोहित पवारांची खिल्ली उडवली. आगामी निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला द्यायची की राष्ट्रवादीला याचा निर्णय महा विकास आघाडीच्या बैठकीत होईल, असे मत आमदार रोहित पवार यांनी आठ दिवसांपूर्वी सोलापुरात व्यक्त केले होते. यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवारांची खिल्ली उडवत प्रतिक्रिया दिली.
VIDEO: कोण रोहित पवार? आमदार प्रणिती शिंदे यांनी उडवली खिल्ली pic.twitter.com/9otOf05Q3g
— Lokmat (@lokmat) February 10, 2023
प्रणिती शिंदेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचदरम्यान रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार प्रणिती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करतायेत, पण कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूय, असं रोहित पवार यांनी सांगितले. तसेच राहीला प्रश्न सोलापूरच्या जागेचा तर त्यासंदर्भात दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील, मी कुठलाही दावा केला नव्हता, मी केवळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली होती, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवारांच्या या प्रतिक्रियेने सर्वांचं मन जिंकल्याची भावन सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघान काँग्रेसचा दोन वेळा पराभव झाला. त्यामुळेच या मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा असल्याचे मत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी व्यक्त केले होते. हा वाद वाढू नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते प्रयत्नशील होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गुरुवारी रात्री शिंदे यांच्या जनवात्सल्य बंगल्यावर भेटही झाली होती. या भेटीनंतर हा वाद शमला असे वाटत असताना आमदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया आली. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खवळले.
राष्ट्रवादीत रात्री राडा होता होता राहिला...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गुरुवारची भेट अचानक ठरली होती. काँग्रेस त्यांकडून पाच नेहमीच अवमान होतोय. यातून पक्षाचे नुकसान होणार. त्यामुळे जयंत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांना भेटू नये असा आग्रह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करीत होते. शहराध्यक्ष भारत जाधव, महेश कोठे, नलिनी घटेले प्रशांत बाबार, जुबेर बागवान आदीनी पाटील यांना तसा निरोपही दिला. ही भेट निश्चित करणारे कार्यकर्ते आणि प्रशांत बाबर यांच्यात राडा होता होता राहिला होता. डकडे काँग्रेसचे कार्यकर्ते होते.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कशी जिरवली, असे फोन करुन एकमेकांना सांगत होते. जयंत पाटील रात्री १०.३० च्या सुमाराला सिटे यांना भेटले. यावेळी शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे घराबाहेर थांबले या भेटीवेळी आमदार प्रणिती शिंदे घरा होत्या. मात्र, त्यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली नसल्याचे कार्यकर्त्यांनी पत्रकारांना सांगितले.