Sharad Pawar On Ajit Pawar: 'अजित पवार नाराज असल्याचं काहीजण म्हणतात, पण...'; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 06:42 PM2023-06-10T18:42:16+5:302023-06-10T18:50:00+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षांची निवड केल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

NCP president Sharad Pawar has clarified that opposition leader Ajit Pawar is not upset. | Sharad Pawar On Ajit Pawar: 'अजित पवार नाराज असल्याचं काहीजण म्हणतात, पण...'; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले!

Sharad Pawar On Ajit Pawar: 'अजित पवार नाराज असल्याचं काहीजण म्हणतात, पण...'; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले!

googlenewsNext

मुंबई: राष्ट्रवादीचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले आहे. 

शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणासर यावरून चर्चा रंगली होती. कार्यकर्ते, नेत्यांच्या आग्रहानंतर पवार यांनी हा निर्णय बदलला होता. परंतु, आज त्यांनी एकप्रकारे आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली आहे. 

पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे - सुप्रिया सुळे 

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा राष्ट्रवादीची धुरा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार की सुप्रिया सुळेंकडे सोपविणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र आता अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र स्वत: शरद पवार यांनी अजित पवारांबाबत सुरु असलेल्या नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. 

'अजित पवार यांच्यावरचा अन्याय आता सहन होत नाही'; सुप्रिया सुळेंचं अभिनंदन करत मनसेचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षांची निवड केल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, अध्यक्ष पदाची जागा आत्ता रिकामी नाही. भविष्यात काय होईल याचं उत्तर काय देणार? राष्ट्रीय अध्यक्ष पद रिकामं झाल्यावर नवीन अध्यक्षांचा विचार करू, असं शरद पवारांनी सांगितले. तसेच हा माझा वैयक्तिक निर्णय नाही, पक्षानं सामूहिक विचार विनिमयानं घेतलेला हा निर्णय घेतला असल्याचे शरद पवारांनी सांगितले. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर जबाबदारी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. त्याचप्रमाणे अजित पवार नाराज आहे असं काहीजण म्हणतात. पण यामध्ये काही तथ्यं नसल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, कार्यकारी अध्यक्ष पदावर नेमणूक झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. अजित पवार यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांचे अभिनंदन केले. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली हृदयात महाराष्ट्रनजरे समोर राष्ट्र हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन, असे अजित पवारांनी म्हटले आहे. 

Web Title: NCP president Sharad Pawar has clarified that opposition leader Ajit Pawar is not upset.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.