उत्तर मध्य मुंबई : आरोप-प्रत्यारोपांत रंगले सोशल युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 02:46 AM2019-04-27T02:46:53+5:302019-04-27T02:47:39+5:30

तरुणाईला आकर्षित करण्यासाठी विविध व्हिडीओंचा आधार

North Central Mumbai: Social warfare accusations and antitrust | उत्तर मध्य मुंबई : आरोप-प्रत्यारोपांत रंगले सोशल युद्ध

उत्तर मध्य मुंबई : आरोप-प्रत्यारोपांत रंगले सोशल युद्ध

googlenewsNext

मुंबई : उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या उमेदवार पूनम महाजनकाँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्यामध्ये चुरशीची लढत लढली जात आहे. प्रत्यक्ष मैदानात सुरू असलेल्या या लढाईव्यतिरिक्त सोशल मीडियावरही मोठे घमासान सुरू आहे. 

सोशल मीडियाचा वापर करून तरुणाईला आपल्याकडे वळविण्याचा प्रचार पद्धतशीरपणे केला जात आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने त्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत. ‘सोच कर, समझ कर, मुंबईकर व्होट कर’ असा मतदानाचा संदेश देणारी चित्रफीत महाजन यांच्यातर्फे तयार करण्यात आली आहे. दत्त यांच्यातर्फेदेखील सोशल मीडियावर मतदानाचे आवाहन करणारे संदेश पसरविले जात आहेत.
सेलिब्रेटी मतदार ते झोपडीधारक मतदार असा लोलक असणाऱ्या या मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने दिली जात आहेत. दत्त व महाजन या दोन्ही उमेदवारांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये करण्यात आलेल्या विविध विकासकामांची चित्रफीत बनविली आहे. निवडून आल्यावर काय करणार, याची ग्वाही देणारे संदेश व्हायरल केले जात आहेत.


पूनम महाजन : भाजप
फेसबुक- २५,३५,४५७ पेज लाइक्स
७- पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट.
ट्विटर - ६,२५,७५४ फॉलोअर्स
८- पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट.

कोणत्या मुद्द्यांवर भर
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला अधिक चांगल्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न.
पाच वर्षांत केलेली विकासकामे व विजयी झाल्यावर उर्वरित कामे पूर्णत्वास नेण्याची ग्वाही.

प्रिया दत्त : काँग्रेस
फेसबुक- २,०२,०३१ पेज लाइक्स
६- पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट.
ट्विटर- १,५२,१८२ फॉलोअर्स
९- पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट.

कोणत्या मुद्द्यांवर भर
ही एका मतदारसंघाची लढाई नव्हे, तर देश वाचविण्याची व संविधान वाचविण्याची लढाई आहे यावर भर.
विकासाच्या नावाने नागरिकांची फसवणूक, विजयी झाल्यावर प्रलंबित कामे पूर्ण करण्याची ग्वाही.

Web Title: North Central Mumbai: Social warfare accusations and antitrust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.