नॅशनल हेराॅल्डप्रकरणी एका पैशाचाही गैरव्यवहार नाही, काँग्रेसची माहिती; ईडी कार्यालयासमोर आज आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:43 AM2022-06-13T05:43:18+5:302022-06-13T05:43:43+5:30

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नाही. एकाही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण फक्त गांधी कुटुंबाला त्रास देण्यासाठी उकरून काढण्यात आले आहे. 

Not a single penny was misappropriated in the National Herald case says Congress Movement in front of ED office today | नॅशनल हेराॅल्डप्रकरणी एका पैशाचाही गैरव्यवहार नाही, काँग्रेसची माहिती; ईडी कार्यालयासमोर आज आंदोलन

नॅशनल हेराॅल्डप्रकरणी एका पैशाचाही गैरव्यवहार नाही, काँग्रेसची माहिती; ईडी कार्यालयासमोर आज आंदोलन

Next

मुंबई :

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नाही. एकाही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण फक्त गांधी कुटुंबाला त्रास देण्यासाठी उकरून काढण्यात आले आहे. केंद्र सरकारने राजकीय द्वेष भावनेतून सोनिया आणि राहुल गांधी यांना ईडीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. भाजपच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस सोमवारी मुंबई आणि नागपूर येथील ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.

लोंढे म्हणाले की, १९३७ साली पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पुरुषोत्तम टंडन, आचार्य नरेंद्र देव, रफी अहमद किडवई या महान नेत्यांनी या वृत्तपत्राची स्थापना केली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत नॅशनल हेराॅल्डने मोलाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतरही लोकशाही, संविधान व काँग्रेसचा विचार पुढे चालू ठेवण्यासाठी हे वर्तमानपत्र तोट्यात असतानाही चालूच ठेवले होते. या वर्तमानपत्रातील पत्रकार, कर्मचारी यांचा पगार देता 
यावा यासाठी काँग्रेसने नॅशनल हेराॅल्डला २००२ ते २०११ दरम्यान ९० कोटी रुपये १०० हप्त्यात कर्जाने दिले. अशा प्रकारे कर्ज देणे कोणत्याही कायद्याखाली बेकायदेशीर नाही. 

९० कोटींचे हे कर्ज नॅशनल हेराॅल्डला परत करणे शक्य नसल्याने असोसिएटेड जनरल लिमिटेडने ते इक्विटी शेअरमध्ये परावर्तित केले आणि हे शेअर ‘यंग इंडिया’ या ’नॉट फॉर प्रॉफिट’ कंपनीला कलम २५ अंतर्गत हस्तांतरित करण्यात आले. त्यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत ऑस्कर फर्नांडिस, दिवंगत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे हे या कंपनीचे व्यवस्थापकीय सदस्य होते. यांना कोणत्याही प्रकारचा लाभांश मिळालेला नाही. हे सर्व सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ असताना केवळ राजकीय द्वेषातून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप लोंढे यांनी केला.

हुकूमशाहीसमोर काँग्रेस कधी झुकणार नाही
0 भाजपच्या हुकूमशाहीसमोर काँग्रेस कधीही झुकणार नाही. सोमवारी १३ जून रोजी देशभर ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करून कारवाईचा तीव्र निषेध केला जाईल. 
0 मुंबईत दुपारी १२ वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ईडी कार्यालय मोर्चा काढला जाणार आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

Web Title: Not a single penny was misappropriated in the National Herald case says Congress Movement in front of ED office today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.