पक्षातच नव्हे, पवार कुटुंबातही फूट, अन् सुप्रिया सुळे झाल्या भावुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 04:56 AM2019-11-24T04:56:42+5:302019-11-24T04:57:11+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेच

Not only in the party, but also rift in the Pawar family | पक्षातच नव्हे, पवार कुटुंबातही फूट, अन् सुप्रिया सुळे झाल्या भावुक!

पक्षातच नव्हे, पवार कुटुंबातही फूट, अन् सुप्रिया सुळे झाल्या भावुक!

Next

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेच, शिवाय पवार कुटुंबाला धक्का बसला आहे. या अनपेक्षित धक्क्यामुळे शरद पवारांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे तर खूपच भावुक झाल्या. एरवी टिष्ट्वटरवर सक्रीय असणाऱ्या सुप्रियांनी व्हॉट्सअप स्टेट्सवर 'पक्ष आणि कुटुंब दोन्ही फुटले आहेत’ अशी माहिती दिली तर त्यानंतर काही वेळातच‘विश्वास नेमका ठेवायचा कुणावर?’, असे भावनिक स्टेट्स ठेवले.

अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहीण-भावाचे खूप आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. सिंचन घोटाळा असो की, राज्य शिखर बँक प्रकरणी आलेली ईडीची नोटीस असो अशा प्रत्येक प्रसंगी सुप्रिया यांनी अजित पवारांची पाठराखण केलेली आहे. शरद पवार यांना ईडीची नोटीस आल्यानंतर अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. ते काही काळ अज्ञातवासातही गेले होते. त्यावेळीही सुप्रियांनी अजितदादांचीच बाजू घेतली होती. मात्र, शरद पवार आणि पक्षाला अंधारात ठेऊन अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाचा त्यांना धक्का बसल्याचे दिसून आले.

रोहित पवार आजोबांसोबत
शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे आजोबासोबत असल्याचे दिसते. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेला उमेदवारी देण्यावरून पवार कुटुंबात मतभेद झाले होते. त्यावेळीही रोहित यांनी आजोबांचीच बाजू घेतली होती.

Web Title: Not only in the party, but also rift in the Pawar family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.