उद्धव ठाकरे यांच्या बिनविरोध आमदार होण्याच्या मार्गात अडथळे, काँग्रेसकडून दोन जागा लढवण्याचे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 06:28 PM2020-05-06T18:28:08+5:302020-05-06T18:34:36+5:30

२१ मे रोजी होणारी विधान परिषदेच्या ९ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आज काँग्रेसने विधान परिषदेच्या दोन जागा लढवण्याचे संकेत दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या बिनविरोध आमदार होण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.

Obstacles in Uddhav Thackeray's path to becoming an unopposed MLC BKP | उद्धव ठाकरे यांच्या बिनविरोध आमदार होण्याच्या मार्गात अडथळे, काँग्रेसकडून दोन जागा लढवण्याचे संकेत?

उद्धव ठाकरे यांच्या बिनविरोध आमदार होण्याच्या मार्गात अडथळे, काँग्रेसकडून दोन जागा लढवण्याचे संकेत?

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे विधान परिषदेची ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होतीराज्य विधान परिषदेची निवडणूक घेण्यात यावी असे पत्र राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होतेत्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यास मान्यता दिल्याने हा तिढा सुटला होता.

मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळ सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  आता २१ मे रोजी होणारी विधान परिषदेच्या ९ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आज काँग्रेसने विधान परिषदेच्या दोन जागा लढवण्याचे संकेत दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या बिनविरोध आमदार होण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.

कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे विधान परिषदेची ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र त्यावरून मोठे राजकीय नाट्य रंगले होते. अखेरीस राज्य विधान परिषदेची निवडणूक घेण्यात यावी असे पत्र राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यास मान्यता दिल्याने हा तिढा सुटला होता.

दरम्यान सध्याच्या समीकरणांनुसार शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, काँग्रेसचा एक असे मिळून महाविकास आघाडीचे ५ आणि भाजपाचे तीन आमदार थेट निवडून येऊ शकतात. मात्र नवव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाकडून चौथा उमेदवार उतरवला जाण्याची शक्यता आहे. तर आता काँग्रेसनेही दुसरा उमेदवार विधान परिषदेच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी केली आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
महाविकास आघाडीकडे सहा उमेदवार निवडून आणण्याइतपत संख्याबळ आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत ९ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात उतरणार असल्याने २१ मे रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार हे आता निश्चित झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

coronavirus: कोरोनामुळे संकटात रोजगार, या योजनेंतर्गत दोन वर्षे खात्यात पैसे जमा करणार मोदी सरकार

coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह

भारतासाठी मोठी बातमी...कोरोनावरील ३० लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत; वैज्ञानिकांची मोदींना माहिती
 

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांची उमेदवारी निश्चित आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना पहिल्या पसंतीची मते मिळणार असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे.

Web Title: Obstacles in Uddhav Thackeray's path to becoming an unopposed MLC BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.