पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण: राहुल गांधींना हायकोर्टाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 06:56 AM2023-06-13T06:56:05+5:302023-06-13T06:56:14+5:30

राफेल विमानांच्या व्यवहारावरून २०१८ मध्ये गांधी यांनी एका प्रचारसभेत पंतप्रधानांचा उल्लेख ‘’कमांडर-इन-थीफ’’ असा केला होता.

Offensive statement on PM Modi: High Court relief to Rahul Gandhi | पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण: राहुल गांधींना हायकोर्टाचा दिलासा

पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण: राहुल गांधींना हायकोर्टाचा दिलासा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. दंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्यासाठी दिलेल्या मुदतीत उच्च न्यायालयाने २ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. न्या. सारंग कोतवाल यांच्या एकलपीठाने २  ऑगस्टपर्यंत सुनावणी तहकूब केली. राफेल विमानांच्या व्यवहारावरून २०१८ मध्ये गांधी यांनी एका प्रचारसभेत पंतप्रधानांचा उल्लेख ‘’कमांडर-इन-थीफ’’ असा केला होता.

Web Title: Offensive statement on PM Modi: High Court relief to Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.