पालघरमध्ये भाजपचा नाही, तर साम, दाम, दंड, भेदाचा विजयः खा. अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 09:04 PM2018-05-31T21:04:52+5:302018-05-31T21:04:52+5:30

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा नाही तर साम, दाम, दंड, भेदाचा विजय झाला असून भाजपला या विजयाचा उत्सव साजरा करण्याचा अधिकार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

In Palghar, the BJP is not, but Samaj, Prams, Penalties, Victory of Victory: eat Ashok Chavan | पालघरमध्ये भाजपचा नाही, तर साम, दाम, दंड, भेदाचा विजयः खा. अशोक चव्हाण

पालघरमध्ये भाजपचा नाही, तर साम, दाम, दंड, भेदाचा विजयः खा. अशोक चव्हाण

googlenewsNext

मुंबई- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा नाही तर साम, दाम, दंड, भेदाचा विजय झाला असून भाजपला या विजयाचा उत्सव साजरा करण्याचा अधिकार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना खा. चव्हाण म्हणाले की, आज जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालामध्ये देशभरात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. लोकसभेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळविता आला आहे तर विधानसभेच्या 11 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळाला आहे.

देशभरात समविचारी पक्ष एकत्र आल्याने भाजपचा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात आज दोन ठिकाणी लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. या दोन्ही जागा भाजपकडे होत्या. त्यातील भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती. त्या ठिकाणी आघाडीचे उमेदवार मधुकरराव कुकडे विजयी झाले आहेत. नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारवर जे आरोप करून खासदारकीचा राजीनामा दिला, त्या आरोपांवर एकप्रकारे या निकालातून  शिक्कामोर्तब झाले आहे. हा मोदी सरकारचा मोठा पराभव आहे, असे खा. चव्हाण म्हणाले.

पालघरचा निकाल काँग्रेस पक्षासाठी धक्कादायक आहे. पालघरमध्ये झालेला पराभव खुल्या दिलाने स्वीकारतो. या निवडणुकीतही समविचारी पक्षांशी आघाडी व्हावी, असेच आमचे प्रयत्न होते. राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आमच्या सोबतच होती. त्याही पलिकडे जाऊन आम्ही विचार करत होतो. परंतु, काही कारणांमुळे हा विचार प्रत्यक्षात येऊ शकला नाही. पण सर्व धर्मनिरपेक्ष समविचारी पक्ष एकत्र आले असते तर आज पालघरचे चित्र वेगळे दिसले असते.

लोकशाही आणि निवडणूक आचारसंहिता व नैतिक मूल्यांना धाब्यावर बसवून भाजपने आपली प्रचार मोहीम राबवली. काँग्रेस पक्षाने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारीही केल्या. मात्र दुर्दैवाने आयोगाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. शिवसेनेचा ढोंगीपणा आज पुन्हा उघड झाला आहे. भ्रष्टाचारी आणि लाचारी ह्या दोन्ही प्रवृत्ती एकत्र नांदत असतात याचे उदाहरण शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष आहेत. कर्नाटकप्रमाणे आगामी काळात महाराष्ट्रातही सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन भाजपचा पराभव करु असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.   

Web Title: In Palghar, the BJP is not, but Samaj, Prams, Penalties, Victory of Victory: eat Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.