विलेपार्ले पूर्व येथील मोंधीबाई मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मिळाली अखेर परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 09:32 PM2018-09-04T21:32:19+5:302018-09-04T21:32:47+5:30
विलेपार्ले पूर्व येथील मोंधीबाई मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मिळाली अखेर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली आहे.
मुंबई -विलेपार्ले पूर्व येथील मोंधीबाई मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मिळाली अखेर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाची परवानगी मिळाली आहे. गेली 70 वर्षे येथे गणपती साजरा केला जातो.मात्र येथे गावडे हॉस्पिटल लगत हा येथील गणपती असल्याने मुंबई उच्च न्यायलयाच्या निर्देशाप्रमाणे येथील शांतता झोन मध्ये या गणपतीला परवानगी नाकारली होती.मुंबईचे महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांनी गेल्या शनिवारी या ठिकाणी भेट दिली होती.
या संदर्भात आज सायंकाळी विभागप्रमुख आमदार अँड.,अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली अंधेरी पूर्व येथील के विभाग वार्ड ऑफिसर प्रशांत सकपाळे यांच्या बरोबर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने चर्चा करून विलेपार्ले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला न्याय मिळवून दिला अशी माहिती या मंडळाने लोकमतशी बोलतांना दिली.
आमदार परब,वॉर्ड ऑफिसर, विलेपार्ले पूर्व पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण आणि वाहतूक अधिकारी तांबे यांच्यात सुमारे दोन तास काँफेरन्सवर चर्चा झाली.येथील गणपती हा शांतता क्षेत्रात येत असल्याने येथील मंडळ कोणत्याही प्रकारचा ध्वनीक्षेपक लावणार नाही अशी यशस्वी चर्चा झाली.आणि अखेर या मंडळाला परवानगी मिळाली.शिवसेनेच्या प्रयत्नांनी आमच्या मंडळाला परवानगी मिळाल्याबद्धल त्यांनी महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर व आमदार अँड.परब यांचे जाहिर आभार मानले आहेत.