मोरारजी देसाईंविरोधातील याचिका फेटाळली; वकिलालाच ठोठावला 50 हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 05:34 PM2019-08-22T17:34:21+5:302019-08-22T17:34:39+5:30

मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

Petition against Morarji Desai rejected; Advocate fined 50 thousand by high court | मोरारजी देसाईंविरोधातील याचिका फेटाळली; वकिलालाच ठोठावला 50 हजारांचा दंड

मोरारजी देसाईंविरोधातील याचिका फेटाळली; वकिलालाच ठोठावला 50 हजारांचा दंड

Next

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 


देसाई यांनी 'द स्टोरी ऑफ माय लाइफ' मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल आणि त्यामध्ये गेलेल्या हुतात्मांबद्दल अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. असा आरोप या वकिलाने केला आहे. यामुळे त्यांना दिलेला पुरस्कार मागे घेण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली होती. उच्च न्यायालायाने ती याचिका फेटाळली आहे. 


देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाईंविरोधात अशी अर्थहीन याचिका एका वकिलाकडूनच दाखल होणे हे दुर्दैवी असल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले आहेत. तसेच या वकिलाला 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे. 

Web Title: Petition against Morarji Desai rejected; Advocate fined 50 thousand by high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.