"...म्हणून राज ठाकरे, अजित पवार अन् उद्धव ठाकरेंनी मला भाजपा सोड असं म्हणायची हिंमत केली नाही"

By मुकेश चव्हाण | Published: October 11, 2020 05:12 PM2020-10-11T17:12:34+5:302020-10-11T17:12:44+5:30

भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल बोरिवली येथे सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या सत्कार सोहळ्यात विनोद तावडे बोलत होते.

Phone by MNS chief Raj Thackeray after the 2019 assembly elections," said BJP leader Vinod Tawde | "...म्हणून राज ठाकरे, अजित पवार अन् उद्धव ठाकरेंनी मला भाजपा सोड असं म्हणायची हिंमत केली नाही"

"...म्हणून राज ठाकरे, अजित पवार अन् उद्धव ठाकरेंनी मला भाजपा सोड असं म्हणायची हिंमत केली नाही"

Next

मुंबई: 2019च्या विधानसभा निवडणुकीत मला तिकिट मिळालं नाही. त्यावेळी मला मनसेप्रमुख राज ठाकरेंसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करुन विचारपूस केली होती. परंतु तिकिट न मिळाल्यामुळे भाजपा सोड आणि आमच्याकडे ये, असं म्हणायची हिंमत या नेत्यांपैकी कुणीही केली नाही. मी पक्का संघवाला आहे, विद्यार्थी परिषदेचा आहे, हे त्यांना माहिती आहे, असं दावा माजी मंत्री आणि भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केला आहे. विनोद तावडे यांचं भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल बोरिवली येथे सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या सत्कार सोहळ्यात विनोद तावडे बोलत होते.

विनोद तावडे म्हणाले की, पक्षाने आपल्यासाठी चांगला निर्णय घेतला, तर आपल्याला बर वाटतं आणि जर काही वेगळा निर्णय घेतला तर मग वाईट वाटून घेऊ नये. कारण पक्षाने काही विचार केलेला असतो. जर आज तिकीट दिलं नाही, तर वाईट का वाटलं पाहिजे, असं विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले. 

विनोद तावडेंच्या या वक्तव्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कौतुक केलं आहे. प्रवीण दरेकर म्हणाले की, राजकारणात चढउतार येतच असतात. राजकारणात कुणीही एकाच ठिकाणी राहत नाही. हा साप  शिडीचा खेळ आहे. त्यामुळे विनोद तावडे यांच्याकडून संयम ही एक गोष्ट शिकण्यासारखी असल्याचे प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधील या नव्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधून राष्ट्रीय सहसरचटणीस म्हणून व्ही. सतीश, राष्ट्रीय सचिव म्हणून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून संजू वर्मा, हिना गावित आणि अल्पसंख्याक मोर्चासाठी जमाल सिद्दीकी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. 

विशेष उल्लेखनीय नियुक्त्यांमध्ये कर्नाटकमधील युवा खासदार तेजस्वी सूर्या यांची भाजपाच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच आयटी आणि सोशल मीडियाची जबाबदारी अमित मालवीय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

Web Title: Phone by MNS chief Raj Thackeray after the 2019 assembly elections," said BJP leader Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.