राजकारणी ‘देव’ नाहीत, कायद्यापेक्षा श्रेष्ठही नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:19 AM2018-02-23T06:19:51+5:302018-02-23T06:20:15+5:30

उच्च न्यायालयाने पाणथळीच्या जमिनीवर अतिक्रमण करणा-या शिवसेनेच्या व भाजपाच्या नगरसेवकांवर गुन्हा नोंदविण्याचे निर्देश पोलिसांना गुरुवारी दिले.

Politicians are not 'God', not even better than law! | राजकारणी ‘देव’ नाहीत, कायद्यापेक्षा श्रेष्ठही नाहीत!

राजकारणी ‘देव’ नाहीत, कायद्यापेक्षा श्रेष्ठही नाहीत!

Next

मुंबई : राजकारणी ‘देव’ नाहीत किंवा कायद्यापेक्षा श्रेष्ठही नाहीत, असे म्हणत उच्च न्यायालयाने पाणथळीच्या जमिनीवर अतिक्रमण करणा-या शिवसेनेच्या व भाजपाच्या नगरसेवकांवर गुन्हा नोंदविण्याचे निर्देश पोलिसांना गुरुवारी दिले.
पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणाºया सेनेच्या अनिता पाटील व भाजपाचे परशुराम म्हात्रे यांच्यावर एका आठवड्यात गुन्हा नोंदविण्याचे निर्देश न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने पोलिसांना दिले. राजकीय नेते देव नाहीत. ते कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत. महापालिका व स्थानिक पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करण्यास का घाबरते? तुम्ही धीट असला पाहिजेत. कोणाची भीती तुम्ही बाळगू नये, असे न्यायालयाने म्हटले.
अनिता पाटील आणि परशुराम म्हात्रे यांनी पाणथळीच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्या जागेवर बंगला आणि कार्यालय उभारले. त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवूनही काही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका मीरा-भार्इंदर येथील सामाजिक कार्यकर्ते भारत मोकल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
तहसीलदारांनी संबंधित जागेची पाहणी करत मार्च २०१६मध्ये अहवाल सादर केला. या अहवालात त्यांनी या दोन्ही नगरसेवकांसह अन्य चार जणांनी संबंधित भागातील पाणथळ
नष्ट केल्याचे व त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याचे म्हटले आहे. या अहवालानंतर मोकल यांनी त्याच वर्षी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, या नगरसेवकांना राजकीय पाठिंबा असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर अद्याप काहीही कारवाई केलेली नाही, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले.
गुन्हेगारांवर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिसांना या कायद्याचा आणखी अभ्यास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. ‘गुन्हेगाराला शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात आहे. तसेच कायद्याच्या कलम १७ व १८ अंतर्गत या कायद्याचे उल्लंघन करणाºयांकडून मोठा
दंड वसूल करण्याचीही तरतूद आहे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले.

Web Title: Politicians are not 'God', not even better than law!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.