बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी, ६१ ठिकाणी विसर्जन सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 03:33 AM2018-09-23T03:33:35+5:302018-09-23T03:41:33+5:30

गणरायाला निरोप देण्यासाठी नवी मुंबई, पनवेलकरांनी जय्यत तयारी केली आहे. मिरवणूक व विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांसह महापालिका प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली आहे.

preparations for farewell to Bappa in Navi Mumbai | बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी, ६१ ठिकाणी विसर्जन सोय

बाप्पाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी, ६१ ठिकाणी विसर्जन सोय

Next

नवी मुंबई  - गणरायाला निरोप देण्यासाठी नवी मुंबई, पनवेलकरांनी जय्यत तयारी केली आहे. मिरवणूक व विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांसह महापालिका प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली आहे. ६१ ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गांसह तलावांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पालिकेकडून वाशीसह प्रमुख ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
नवी मुंबई, पनवेलसह उरण परिसरामध्ये ८२८४४ घरांमध्ये व ८३१ सार्वजनिक ठिकाणी गणरायांची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. सातव्या दिवसापर्यंत ४२२ सार्वजनिक व ६१ हजार १२४ घरगुती गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला होता. रविवारी अनंत चतुर्थीदिवशी ४०९ सार्वजनिक व २१७२० खासगी गणेशमूर्तींना निरोप देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकांसाठी शहरातील मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. विसर्जन शांततेमध्ये पार पाडता यावे, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. विसर्जन मार्ग व तलावांवर एकूण ५७२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. श्वान पथकासह साध्या वेशातील पोलीसही गस्त घालणार आहेत. विसर्जन मार्गांवर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाशी, कोपरखैरणे व इतर ठिकाणी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी एक पोलीस उपआयुक्त, एक सहायक आयुक्त, २४ अधिकारी व ४८९ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शहरातील ११३ आरएसपी शिक्षकांचीही मदत घेण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व उलट्या दिशेने प्रवास करणाºया दुचाकीस्वारांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनानेही सर्व २३ विसर्जन तलावांवर यंत्रणा सज्ज ठेवली आहे. स्वयंसेवकांची फळी तयार करण्यात आली आहे. पोहता येणाºया स्वयंसेवकांचीही प्रत्येक तलावांवर नियुक्ती केली आहे. वाशीतील शिवाजी चौकामध्ये मान्यवरांच्या हस्ते गणरायाच्या मूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. अग्निशमन दलाचे जवान तैनात केले आहेत. विसर्जन मार्गावर भक्तांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पाणी, अल्पोपाहाराची सोय उपलब्ध करून दिली आहे. उत्सव शांततेमध्ये पार पाडण्यासाठी नागरिकांनी व गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.

वाहतूक व्यवस्था

वाशी
ऐरोली कोपरखैरणेकडून वाशी शहरात येणारी वाहने ब्ल्यू डायमंड सिग्नल चौकातून कोपरी मार्गे पामबीच रोडवरून इच्छित स्थळी जातील.
वाशी रेल्वेस्थानक, तसेच वाशी हायवेवरून मुंबई बाजूकडून वाशी शहरात येणारी वाहने वाशी प्लाझा हायवे बसस्टॉपच्या पुढे डावीकडे वळण घेऊन पामबीच मार्गे महात्मा फुले चौक, अरेंजा सर्कल, कोपरी सिग्नलकडून इच्छित स्थळी जातील.
वाशी सेक्टर ९, १०, ११, १२ कडून मुंबई व वाशी रेल्वेस्थानकाकडे जाणारी वाहने महानगरपालिका हॉस्पिटल समोरून जुहुगाव सेक्टर ११ ब्ल्यू डायमंड सिग्नल चौकातून कोपरी सिग्नल मार्गे रोडवरून इच्छित स्थळी जातील.
कोपरखैरणे
कलश उद्यान चौक, सेक्टर-११ ते वरिष्ठा चौक सेक्टर-२० कोपरखैरणेमध्ये नो पार्किंग
सिरॉक प्लाझा प्लॉट नंबर २६, २७ व २८ सेक्टर-१९ ए ते स्मशानभूमी खाडीकिनारी प्रवेशबंदी
गणेश दर्शन सोसायटी प्लॉट नंबर २३३ सेक्टर-१९ ए कोपरखैरणे ते श्री गणेश विसर्जन तलाव सेक्टर-१९ ए मध्ये नो पार्किंग

ढोल पथकांना मागणी
विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहर, राजगुरूनगर, सातारा, नाशिकमधील ढोल पथकांना आमंत्रण देण्यात आले आहे. ढोल व लेझीम पथक हे मिरवणुकांचे आकर्षण असणार आहे. डीजेवर बंदी घालण्यात आली असल्यामुळे कोणतेही मंडळ डीजे लावणार नाही.

विसर्जन घाटांवर स्वच्छता अभियान
खारघर शहरातील विसर्जन घाटांवर स्वच्छता अभियान राबवून गोळा केलेल्या कचºयापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा उपक्र म शाश्वत फाउंडेशनने राबविला आहे. शहरातील विसर्जन घाटावर शाश्वतच्या टीम मार्फत हा उपक्र म राबविण्यात आला. फाउंडेशनच्या अध्यक्ष बीना गोगरी यांच्या पुढाकाराने हा उपक्र म राबविण्यात आला. विसर्जन घाटावर पडलेले प्लॅस्टिक, पिशव्या, फळे, हार, फुले आदी कचरा, तसेच निर्माल्य गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच कंपोस्ट खतासाठी आवश्यक असलेला कचरा एकत्रित करून त्याच्यावर प्रक्रि या सुरू केली असल्याचे गोगरी यांनी सांगितले.

पनवेलमध्ये प्रशासन सज्ज

अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जातो. या दिवशी पनवेल तालुक्यात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनही विसर्जन सोहळ्यासाठी सज्ज असून, सर्व विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोळीवाडा, बल्लाळेश्वर तलाव, नवीन पनवेल व खांदेश्वर, आदई तलाव, खारघर सेक्टर १५, ४ तसेच मुर्बी विसर्जन घाट आदीचा समावेश आहे.
तळोजा, कामोठे, खांदा गाव या ठिकाणी शहरातील विविध तलावांत विसर्जन केले जाते.
ग्रामीण भागातही नदी व गावातील तलावात, विसर्जन घाटावर विसर्जन केले जात असून, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Web Title: preparations for farewell to Bappa in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.