काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला; भाजपवर सेनेची मदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 01:57 AM2019-04-06T01:57:52+5:302019-04-06T01:58:32+5:30

प्रतिस्पर्ध्यांमध्ये ‘काटे की टक्कर’ : मराठी टक्का घसरल्याचा फटका कोणाला बसणार ?

The prestige of the Congress; Sena to the BJP | काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला; भाजपवर सेनेची मदार

काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला; भाजपवर सेनेची मदार

Next

शेफाली परब-पंडित

मुंबई : कुलाबा-नरिमन पॉइंट ते वरळी-शिवडी या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा जुन्याच प्रतिस्पर्ध्यांमध्ये ‘काटे की टक्कर’ होणार आहे. मुंबई अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्याकडे सोपविल्यामुळे काँग्रेस पक्षासाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरणार आहे. या भागात मराठी टक्का घसरल्यामुळे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची मदार ताकद वाढलेल्या भाजपवर असणार आहे.
मराठी लोकवस्ती असलेली दक्षिण मुंबई गेल्या काही वर्षांत बहुभाषिक झाली. गुजराती, मारवाडी, जैन समाजाचा टक्का येथे वाढला. यामुळे ताडदेव, चिराबाजार, गिरगाव, खेतवाडी, ग्रँट रोड या भागांमध्ये शिवसेनेची पिछेहाट झाली. तरीही मोदी लाटेमुळे शिवसेनेचे अरविंद सावंत २०१४ मध्ये निवडून आले. मात्र, विधानसभा आणि पालिका निवडणुकीत युती तुटली. त्याचा फटका शिवसेनेला पालिका निवडणुकांमध्ये बसला.

कुलाबा ते ताडदेव येथील नऊपैकी सात प्रभागांमध्ये भाजपने विजय मिळविला आहे. त्यामुळे ही जागा भाजपच्या वाट्याला यावी, यासाठी काही नेत्यांनी जोर लावला होता. भाजपबरोबर पुन्हा सूर जुळणे ही शिवसेनेसाठी या निवडणुकीत जमेची बाजू मानली जाते. मागचे मतभेद विसरून भाजप कार्यकर्तेही जोमाने प्रचारात उतरावेत, यासाठी शिवसेनेने निर्धार मेळावाही घेतला.
२००४ आणि २००९ या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मिलिंद देवरा निवडून आले होते. २०१४च्या निवडणुकीत मोदी फॅक्टरचा फटका त्यांना बसला.
मात्र, गेल्या विधानसभा व पालिका निवडणुकीतील पराभवाचे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसने शक्ती पणाला लावली आहे. येथील गुजराती, मारवाडी, जैन, अल्पसंख्याक, तसेच उच्चवस्त्यांमध्ये देवरा यांनी संपर्क वाढविला आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमधील निवडणूक अटीतटीची होणार आहे.

दोन निवडणुकांचा आढावा

मतदारसंघाचा आतापर्यंतचा सूर

चित्र बदलेल का? कसे?
च्२००९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक तीन जागा जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये एकाच जागेवर अस्तित्व टिकविता आले.
च्कुलाबा ते ताडदेव नऊपैकी सात प्रभागांमध्ये भाजपचे नगरसेवक निवडून आले. शिवसेना-भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीत पुन्हा युती झाली आहे.
च्मराठी टक्का घसरला असून, गुजराती, मारवाडी, जैन असे बहुभाषिक वाढले आहेत.

विधानसभांचे निकाल 2009 विजयी

जागा भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी इतर
कुलाबा ३२.१६% ४०.३३% - - ०.८८
भायखळा - ३१.२२% १७.८० मनसे(२३.३९)
मलबार हिल ४७.७३% २७.७० - - -
मुंबादेवी - ४६.८३% २९.६२ - २०.६१
वरळी - ३४% ३७.८३% -
शिवडी - १०.९६ ४१.१२ मनसे(४५.७१) -


विधानसभांचे निकाल 2014 विजयी

जागा भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी इतर
कुलाबा ४४.८६% १७.४० २४.५७ ५.०९ ४.६५
भायखळा १९.२४% १७.६८ एमआयएम २०.३३%
मलबार हिल ६७.०५% ७.४९४९% १९.९७ ०.७६ २.६९
मुंबादेवी २८.०३ ३५.८१% १४.४४% १.२४ १४.७
वरळी २०.८१ ४.०१ ४०.९०% २५.३८ ५.८
शिवडी १४.९० ८.६६ ४९.२७% ३.५८% -
 


लोकसभेचे निकाल

2009 लोकसभा
निकाल

काँग्रेस
४२.४६%
शिवसेना
२२.७८%
मनसे
२४.९०%
इतर
-

2014 लोकसभा
निकाल


शिवसेना
४८.०४%
काँग्रेस
३१.५५%
मनसे
१९.८७%
 

Web Title: The prestige of the Congress; Sena to the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.