पूजेच्या साहित्याचे भाव कडाडले, अगरबत्तीवरही जीएसटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 02:28 AM2018-09-10T02:28:14+5:302018-09-10T02:28:29+5:30

यंदा गणेशमूर्तींपासून पूजा साहित्यापर्यंत प्रत्येक खरेदीत महागाईचा भडका उडालेला आहे.

The prices of the material of the worship are gorgeous, even if the GST | पूजेच्या साहित्याचे भाव कडाडले, अगरबत्तीवरही जीएसटी

पूजेच्या साहित्याचे भाव कडाडले, अगरबत्तीवरही जीएसटी

Next

मुंबई : यंदा गणेशमूर्तींपासून पूजा साहित्यापर्यंत प्रत्येक खरेदीत महागाईचा भडका उडालेला आहे. कापूर, कापसाच्या वाती, अगरबत्तींचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे वाढत्या दरामुळे ग्राहकांकडून पूजा साहित्याच्या खरेदीसाठी म्हणावी तशी गर्दी अद्याप दिसत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
कापराचा दर पाव किलोमागे सुमारे १०० रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे बाजारात पाव किलो कापरासाठी आता दुकानदाराकडून २५०-३०० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत दर सांगितला जात आहे. कापूर या साहित्यावर १८ टक्के जीएसटी लागू होतो. त्यामुळे ही किंमत वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. अगरबत्तीचे दरही ४०० रुपये किलो ते १००० रुपये किलोदरम्यान वाढले आहेत. तसेच अगरबत्तीवरही पाच टक्के जीएसटी लागू होतो. गेल्या वर्षी ३०० रुपयांना मिळणारा अगरबत्तीचा पुडा यंदा ५०० ते ५२५ रुपयांवर पोहोचला आहे. पूजेचा संपूर्ण संचही २५० ते ३०० रुपयांवरून ५० ते १०० रुपयांनी महागला आहे.
गणेशवस्त्रांच्या किमतीही वाढल्या असून गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. गणपतीच्या मूर्तीवर चढवण्याचे वस्त्रही महागले आहे. या वस्त्राची किंमत त्यावरील कलाकुसरीप्रमाणे वाढते. ती किंमत यंदा १५०-२०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. परिणामी मूर्तीचा आकार, मूर्तीवरील कलाकुसर, मखर यामध्ये थोडीशी कपात करून खर्चावर नियंत्रण आणले तरी पूजेचे साहित्य ही प्राथमिक गरज असते. त्याच्या खर्चात कशी कपात करणार, असा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे. गेल्या वर्षीपर्यंत ७ रुपयांना मिळणारे वातींचे पाकीट यंदा १० रुपयांपासून पुढे उपलब्ध आहे.
्रपर्यावरणपूरक वस्तूंना अधिक मागणी
गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून मुंबईतील बाजारपेठाही हाउसफुल्ल झाल्या आहेत. गणेशोत्सवापूर्वीचा अखेरचा रविवार असल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दीचा ओघ होता. दादर, कुर्ला, लालबाग, मनिष मार्केट, मशीद बंदर येथे पूजा साहित्य, हार-फुले, तोरण, मखर आणि सजावटीसाठी लागणाऱ्या इतर साहित्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र, प्लॅस्टिक आणि थर्माकोलबंदीमुळे काही प्रमाणात व्यवसाय मंद सुरू असल्याची प्रतिक्रियाही विक्रेत्यांनी दिली. यंदा बाजारात सर्वत्र पर्यावरणपूरक वस्तूची चलती दिसत होती. तसेच नागरिकही पर्यावरणपूरक वस्तूंना प्राधान्य देत आहे.

Web Title: The prices of the material of the worship are gorgeous, even if the GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.