खासगी कंपनीला ‘बेस्ट’ कंत्राट; सरकारी उपक्रमाला डावलले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 12:33 AM2019-02-02T00:33:59+5:302019-02-02T06:51:34+5:30

विरोधकांचा सभात्याग; सत्ताधाऱ्यांची कोंडी

Private company 'best' contract; Government initiative | खासगी कंपनीला ‘बेस्ट’ कंत्राट; सरकारी उपक्रमाला डावलले

खासगी कंपनीला ‘बेस्ट’ कंत्राट; सरकारी उपक्रमाला डावलले

Next

मुंबई : बेस्ट बसगाड्यांची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवीन योजना राबविण्यात येणार आहे. मात्र, या योजनेसाठी कमी दराची बोली लावणाºया सरकारी कंपनीला डावलून खासगी कंपनीला काम देण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या व्यवहारावर संशय व्यक्त करीत विरोधी पक्षाने सभात्याग केला. त्यास पहारेकऱ्यांनीही पाठिंबा दर्शविल्यामुळे संख्याबळाअभावी सत्ताधारी शिवसेनेवर सभा गुंडाळण्याची वेळ आली.

इंटरनेटद्वारे प्रवाशांना बेस्ट बसच्या दळणवळणाची माहिती देणाºया यंत्रणेसाठी नेमण्यात येणाºया कंपनीची माहिती प्रशासनाने बेस्ट समितीमध्ये दिली. या कंत्राटासाठी महानगर टेलिफोन निगम कंपनीने पाच लाख रुपये कमी दराची बोली लावली होती, तरीही प्रशासनाने या योजनेबाबत अनभिज्ञ असलेल्या इनसाइट बिझनेस मशिन्स प्रा. लि. या कंपनीला १२ कोटींचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला.
यावर आक्षेप घेत प्रशासनाच्या हेतूवरच विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत संशय व्यक्त केला. मात्र, प्रशासनाकडून कोणतेच ठोस कारण पुढे न आल्यामुळे रवी राजा यांनी सभात्याग केला. प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करीत भाजपानेही विरोधी पक्षाला पाठिंबा दिला. यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी होऊन बैठक तहकूब करण्याची वेळ सत्ताधाºयांवर आली.

कर्मचाऱ्यांची खास भरती
माहिती तंत्रज्ञानाच्या कामासाठी २५ कर्मचारी भरती करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून हे काम करून घेण्याऐवजी खासगी कंपनीला कंत्राट देण्याचे प्रयोजन काय, असा सवाल भाजपाच्या सदस्यांनी केला.
विरोधी पक्षनेते रवी राजा व भाजपा सदस्य नाना आंबोले यांनी फसवणुकीचा निषेध म्हणून सभात्याग केला.
सदस्यांचा आरोपांमुळे अखेर प्रशासनाने पुढील बैठकीत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले.

Web Title: Private company 'best' contract; Government initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.