'राहुल गांधींनी संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला'; फ्लाईंग किसवरुन गदारोळ, संजय राऊतांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 12:12 PM2023-08-10T12:12:23+5:302023-08-10T12:13:20+5:30

राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस देण्याचा आरोप करत भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.

'Rahul Gandhi gave the entire nation a kiss of love' Uproar in parliament over flying kiss, Sanjay Raut's reply | 'राहुल गांधींनी संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला'; फ्लाईंग किसवरुन गदारोळ, संजय राऊतांचे प्रत्युत्तर

'राहुल गांधींनी संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला'; फ्लाईंग किसवरुन गदारोळ, संजय राऊतांचे प्रत्युत्तर

googlenewsNext

लोकसभेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे, मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताल आणला असून काल काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सभागृहात भाषण केले. यावेळी त्यांनी मणिपूर हिंसाचारावरुन मोदी सरकारवर आरोप केले. दरम्यान, राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस देण्याचा आरोप करत भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रीया दिली. 

खरेच फ्लाइंग किस दिले का? भाजपच्या २२ महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

खासदार संजय राऊत म्हणाले, भाजप पक्ष कोणत्या गोष्टींचे कधी राजकारण करेल सांगता येतच नाही. जंतर-मंतर मैदानावर महिला कुस्तीपट्टू आंदालनाला बसल्या होत्या तेव्हा ते तिकडे कधी गेल्याचे दिसले नाही. राहुल गांधींनी द्वेष, बदला यावर उतारा म्हणून संपर्ण देशाला प्रेमाचा किस दिला. जादुकी झप्पी म्हणतो तसा जादुकी फ्लाइंग किस दिला. हा देशासाठी दिला. त्यांनी मोहब्बत की दुकान उघडले आहे, हे त्यातील महत्वाच शस्त्र आहे. भारत जोडो यात्रेत त्यांनी असे अनेक फ्लाइंक किस दिले, ज्यांना प्रेमाची सवय, ममत्व उरली नाही त्यांना प्रेमाचा फ्लाइंग किस काय कळणार, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस देण्याचा आरोप करत भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. यामुळे राहुल गांधी यांचे खरे चरित्र बाहेर आले, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. मात्र भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संसदेत असे काही झालेच नसल्याचे सांगत स्मृती इराणींच्या दाव्यातील हवाच काढली. 

काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी कोणालाही फ्लाइंग किस दिलेले नाही. त्यांच्या हातून काही कागदपत्रे पडली होती. ती उचलत असताना त्यांच्या हाताकडे पाहून असे वाटले असावे. तसेही भाजपचे सरकार राहुल गांधी यांना संसदेत पाहू इच्छित नाही. 

Web Title: 'Rahul Gandhi gave the entire nation a kiss of love' Uproar in parliament over flying kiss, Sanjay Raut's reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.