'राहुल गांधी मारतील दंडे तर आम्ही फेकून मारू अंडे', आठवले ऑन दॅट डे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 10:12 PM2020-02-08T22:12:12+5:302020-02-08T22:12:53+5:30
देशातील युवक पंतप्रधान मोदींना काठीने मारतील असे काँग्रेस नेते राहुल गांधी
नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केलेल्या लाठी-काठीच्या विधानावर सध्या देशभरात वादंग माजलं आहे. विशेष म्हणजे मोदींनीही या विधानाावरुन संसदेतील सभागृहात बोलताना, राहुल गांधींना टोला लगावला होता. या वादग्रस्त विधानाबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे. आता यावरुन, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे.
देशातील युवक पंतप्रधान मोदींना काठीने मारतील असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केल्यानंतर देशात सुरु झालेला वाद अद्यापही सुरूच आहे. आता, रिपाइं नेते रामदास आठवले यांनी या वादात उडी घेतली आहे. राहुल गांधींच्या विधानावरुन आठवलेंनी त्यांच्याच स्टाईलमध्ये राहुल गांधींचा समाचार घेतला. राहुल गांधी जर पंतप्रधानांना काठीने मारतील. तर आम्ही त्यांना अंडे फेकून मारु, असा टोला आठवलेंनी लगावला आहे. वो दंडेसे मारेंगे तो हम अंडे फेक के मारेंगे असे म्हणत आठवलेंनी येथेही कवितास्टाईलने उत्तर दिलंय.
राहुल गांधी के डंडा मारने वाले बयान पर केंद्रीय मंत्री रामदास अठावले: राहुल गांधी अगर प्रधानमंत्री को डंडा मारेंगे तो हम उनको अंडा मारेंगे। ऐसी बयानबाज़ी करते-करते राहुल गांधी अमेठी में हार गए। राहुल गांधी कांग्रेस पार्टी को खोखला कर रहे हैं,वो कांग्रेस पार्टी को नष्ट कर रहे हैं। pic.twitter.com/ZCO5Qbvbev
— ANI_HindiNews (@AHindinews) February 8, 2020
बेरोजगारी वाढत राहिली तर सहा महिन्यांनी देशातील युवक पंतप्रधान नरेंद्र मोदींना काठ्यांनी चोप देऊन देशाबाहेर हाकलतील, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते. त्याला लोकसभेत प्रत्युत्तर दिल्यानंतर मोदींनी आसाममधील कोकराझार येथील सभेतही राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. काही नेते मला काठ्यांनी चोप देण्याच्या गोष्टी करतात. मात्र देशातील माता-भगिनींच्या आशीर्वादामुळे माझा बचाव होईल. आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात. त्यामुळे माझा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. ज्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या प्रमाणात माता-भगिनींची सुरक्षा मिळाली, त्याच्यावर कितीही काठ्यांचा मारा झाला तरी त्याच काहीही वाकड होणार नाही, असे मोदींनी म्हटले आहे.