'राहुल गांधी बालबुद्धी असलेला नेता, स्वेअर फूट अन् मीटरमधील फरक सांगावा'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 11:57 AM2019-03-05T11:57:32+5:302019-03-05T11:58:35+5:30
राहूल गांधींनी आधी स्क्वेअर फूट, स्क्वेअर मीटर आणि स्क्वेअर इंच यामधला फरक सांगावा. मी माझं नाव बदलून दुसरं काम करेल,
मुंबई - भाजपा खासदार पूनम महाजन यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना चक्क बालबुद्धी असलेला नेता, असे संबोधले आहे. राहुल गांधी 50 वर्षांचा असला तरी बालबुद्धी असलेला नेता आहे, अशी व्यंगात्मक टीपण्णी पूनम महाजन यांनी केली आहे. पूनम यांनी राहुल गांधींच्या मुंबईतील सभेचा दाखला देत कुर्ला येथील गृहप्रकल्पाच्या कार्यक्रमात त्यांच्यावर ही टीका केली.
राहूल गांधींनी आधी स्क्वेअर फूट, स्क्वेअर मीटर आणि स्क्वेअर इंच यामधला फरक सांगावा. मी माझं नाव बदलून दुसरं काम करेल, असे आव्हानही महाजन यांनी राहुल गांधींना दिलंय. राहुल यांनी मुंबईतील सभेत बोलताना, 500 स्केअर फूटची घरे देण्याचं आश्वासन मुंबईकरांना दिलं होत. त्यावरुन, पूनम महाजन यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं. 50 वर्षांचा युवक राहुल गांधी वांद्र्यात येऊन गेला. त्यावेळी 500 स्वेअर फूटची घरे देण्याचं आश्वासन देऊन गेला. पण, 50 वर्षांचा असला तरी हा बालबुद्धी असलेला नेता आहे, अशी खरमरीत टीका पूनम यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत. जनतेला घरे देण्यासाठी ते प्रयत्नशील असून प्रत्येक बाबींचा पाठपुरावा करत आहेत. 2022 पर्यंत सर्वांना घरं हा प्रकल्प म्हणजे मुंबईला वर्ल्ड क्लास सिटी बनविण्याची चावी असल्याचे सांगत पूनम यांनी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल आहे. राहुल गांधी मोदीसोबत वाद विवाद घालण्याची भाषा करतो, आधी माझ्यासोबत वाद घालून दाखवा, असेही पूनम यांनी म्हटलं आहे.
Truly grateful to CM Shri @Dev_Fadnavis ji for working relentlessly towards ensuring that this long pending issue was resolved and people are given homes. This is a key project that will go a long way in making Mumbai a world class city for all its citizens.
— Poonam Mahajan (@poonam_mahajan) March 4, 2019