Rajya Sabha Election 2022: राष्ट्रवादीच्या आतापर्यंत २० आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क; सुनिल तटकरे पोलिंग एजंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 09:42 AM2022-06-10T09:42:21+5:302022-06-10T09:47:58+5:30

राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वात आधी मतदानाचा हक्क बजावला.

Rajya Sabha Election 2022: So far 20 NCP MLAs have exercised their voting Rajya Sabha Election; MLA Sunil Tatkare Polling Agent | Rajya Sabha Election 2022: राष्ट्रवादीच्या आतापर्यंत २० आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क; सुनिल तटकरे पोलिंग एजंट

Rajya Sabha Election 2022: राष्ट्रवादीच्या आतापर्यंत २० आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क; सुनिल तटकरे पोलिंग एजंट

Next

मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीच्या आतापर्यंत २० आमदारांनी मतदान केल्याची माहिती समोर येत आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वात आधी मतदानाचा हक्क बजावला. मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी देखील मतदान केलं आहे. 

सर्वांत पहिले राष्ट्रवादीचे सर्व आमदार मतदान करणार, त्यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार मतदानाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून आमदार सुनिल तटकरे आणि मंत्री जयंत पाटील, शिवसेनेकडून सुनिल प्रभू आणि काँग्रेसकडून मंत्री अशोक चव्हाण पोलिंग एजंट असल्याची माहिती समोर आली आहे.

आपल्या कोणत्याही आमदाराचे मत बाद ठरू नये म्हणून प्रत्येक पक्ष डोळ्यात तेल घालून खबरदारी घेत आहे. कशा पद्धतीने मतदान करायचे, दुसऱ्या पसंतीची मते देताना काय काळजी घ्यायची, हे आमदारांना समजावून सांगत मतदानाची रंगीत तालीम घेण्यात आली. भाजपकडून आमदारांची पळवापळवी होऊ शकते हे गृहीत धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी फिल्डिंग लावली आहे. 

दरम्यान, आज सकाळीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम पक्षाचे दोन्ही आमदार महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी आमचा पक्ष एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमच्या महाराष्ट्रातील दोन्ही आमदारांना कॉंग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितले असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. 

भाजपाची सगळी गणितं जुळली- 

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत भाजपाच्या तीनही जागा निवडून येणार, असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपाची सगळी गणितं जुळली आहेत, अशी माहितीही गिरीश महाजन यांनी दिली. तसेच आमदारांना सर्व सूचना दिलेल्या आहेत, ते त्याचे पालन करतील. तसेच शंभर टक्के विजय भाजपाचाच होणार आहे, असं भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

रिंगणातील उमेदवार-

भाजपा : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक 
शिवसेना : संजय राऊत आणि संजय पवार 
राष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेल 
काँग्रेस :  इम्रान प्रतापगडी 

Web Title: Rajya Sabha Election 2022: So far 20 NCP MLAs have exercised their voting Rajya Sabha Election; MLA Sunil Tatkare Polling Agent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.