महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी प्रभारी मुंबईत १२ तारखेला थोरातांची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 08:01 PM2023-02-09T20:01:56+5:302023-02-09T20:04:59+5:30

ज्येष्ठ नेत्यांशीही करणार चर्चा

resolve the dispute in सaharashtra Congress the in charge h k patil will meet balasaheb thorat on 12th in mumbai | महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी प्रभारी मुंबईत १२ तारखेला थोरातांची भेट घेणार

महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी प्रभारी मुंबईत १२ तारखेला थोरातांची भेट घेणार

Next

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू असतानाच आणि त्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींना लिहलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील येत्या १२ फेब्रुवारी रोजी मुंबईत येत आहेत. 

आपल्या मुंबई भेटीत एच. के. पाटील बाळासाहेब थोरातांची भेट घेणार आहेत. 'हात से हात जोडो' या अभियानाचा आढावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्याकडून घेणार आहेत. सध्याकाळी राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, सुनील केदार, विजय वड्डेटीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराच्या गोंधळावरून प्रदेश काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हा वाद सुरू झाला आहे. दुसरीकडे नागपूर विधानपरिषद निवडणुकीतील गोंधळावरून काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन नाना पटोले यांच्याविरोधात  तक्रारही केल्याची चर्चा आहे. 

बाळासाहेब थोरातांची नाराजी दूर होणार?

एच. के. पाटील यांच्या १२ तारखेच्या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख विधिमंडळ पक्षनेते असाच करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची जी चर्चा आहे, त्याबाबत काँग्रेसकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट होते. थोरात यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न एच. के. पाटील या भेटीत करणार असून नाना पटोले यांच्याबरोबर आपण काम करू शकत नाही, या थोरातांनी केलेल्या तक्रारीवरही थोरात आणि नंतर ज्येष्ठ नेत्यांबरोबर पाटील चर्चा करणार आहेत. या बेैठकीनंतर पाटील आपला अहवाल पक्षाच्या अध्यक्षांना पाठण्याची शक्यता असून त्यानंतर पटोले-थोरात यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: resolve the dispute in सaharashtra Congress the in charge h k patil will meet balasaheb thorat on 12th in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.