Rishi Kapoor passed away: ऋषी कपूर यांच्या निधनानं कलाक्षेत्राची मोठी हानी; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 12:07 PM2020-04-30T12:07:51+5:302020-04-30T12:15:23+5:30
ऋषी कपूर यांच्या निधनानं कलाक्षेत्राची मोठी हानी; मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडालं असून चित्रपट रसिकांनादेखील धक्का बसला आहे. राजकीय नेत्यांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनेते ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 30, 2020
ऋषी कपूर यांच्या निधनामुळे कला क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. 'भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. ऋषी कपूर चित्रपट सृष्टीतील २ पिढ्यांदरम्यान मार्गदर्शक दुवा होते, हा दुवा निखळला आहे. निखळ करमणूक व चित्रपट सृष्टीत आशयाच्या, तंत्रज्ञानाच्या अंगाने प्रयोग करण्यात ते यशस्वी ठरले. ते सहज सूंदर अभिनेते व तितकेच परखड, प्रांजळ व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने भारतीय कलाक्षेत्राची हानी झाली आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
ते चित्रपट सृष्टीतील २ पिढ्यांदरम्यान मार्गदर्शक दुवा होते,हा दुवा निखळला आहे. निखळ करमणूक व चित्रपट सृष्टीत आशयाच्या, तंत्रज्ञानाच्या अंगाने प्रयोग करण्यात ते यशस्वी ठरले.ते सहज सूंदर अभिनेते व तितकेच परखड,प्रांजळ व्यक्ती होते.त्यांच्या निधनाने भारतीय कलाक्षेत्राची हानी झाली आहे
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 30, 2020
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'हा आठवडा भारतीय तित्रपटसृष्टीसाठी धक्कादायक ठरला आहे. आणखी एक दिग्गज अभिनेता आपण गमावला आहे. ऋषी कपूर उत्तम अभिनेते होते. अनेक पिढ्यांमध्ये त्यांचे चाहते होते. ते कायम स्मरणात राहतील. या कठीण काळात माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत,' अशा शब्दांत राहुल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
This is a terrible week for Indian cinema, with the passing of another legend, actor Rishi Kapoor. A wonderful actor, with a huge fan following across generations, he will be greatly missed. My condolences to his family, friends & fans all over the world, at this time of grief.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 30, 2020
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कूपर यांच्या निधनानं अतिशय दु:ख झाल्याची भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीनं एक अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. कपूर कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, असं शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Saddened to know about the sad demise of veteren actor Rishi Kapoor. Indian film industry has lost a versatile and charismatic actor. My sincere condolences to Kapoor family.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 30, 2020
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील ऋषी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. 'प्रिय चिंटू यांच्या निधनानं दु:ख झालं. ते अतिशय प्रतिभावंत अभिनेते आणि उत्तम माणूस आणि मित्र होते. नीतू, रणबीर, डबू, रिमा, चिंपू आणि कपूर कुटुंबातील सगळ्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. चिंटू तुमच्या आत्म्याला शांती लाभो. तुम्ही कायम स्मरणात राहाल,' अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या आहेत.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; Sachin Tendulkarनं वाहिली श्रद्धांजली
जेव्हा न्युयॉर्कमध्ये उपचारावेळी चिंटू कपूर आणि त्यांच्या जुन्या मित्रामध्ये रंगली होती गप्पांची मैफल