Sushant Singh Rajput : अखेर रिया चक्रवर्तीची तुरुंगातून सुटका, न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 11:20 AM2020-10-07T11:20:30+5:302020-10-07T11:23:34+5:30
Sushant Singh Rajput : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळाण्याची विनंत न्यायालयाकडे केली होती.
मुंबई - सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये अटक झालेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती. मात्र, याप्रकरणी मंगळवारी सुनावणी करताना मुंबई कोर्टाने रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर, आज न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला असून शौविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
मागील सुनावणीमध्ये विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळायला सांगितला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायलयाने रिया चक्रवर्तीसह, सॅम्युल मिरांडा आणि दिपेश सावंत यांना जामीन मंजूर केला आहे. रियाला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला असून पुढील 10 दिवस 11 ते 5 या वेळेत रियाला जवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, शौविक चक्रवर्ती आणि परिवार यांना जामीन देण्यास न्यायलयाने नकार दिला आहे.
Rhea Chakraborty gets bail on personal bond of Rs 1 lakh.
— ANI (@ANI) October 7, 2020
Court says, "Rhea should mark her presence for 10 days in police station after release, deposit her passport, not travel abroad without court permission & inform investigating officer if she has to leave Greater Mumbai" https://t.co/TBCLt1Cblx
रियाला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा
एनसीबीने म्हटले की समाजाला विशेष करून तरूणांना संदेश देण्याची गरज आहे की अमली पदार्थाचे सेवन करण्यापासून दूर रहा. जर त्यांनी असे केले तर त्यांनादेखील अशाच प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. 8 सप्टेंबरला एनसीबीने बरीच चौकशी केल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक केली होती. जर या प्रकरणात रिया चक्रवर्ती दोषी आढळली तर तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एनसीबीने ड्रग्स अँगलचा तपास करत आहे. एनसीबीला या तपासात पुरावे हाती लागले आहेत. आतापर्यंत एनसीबीने 17 जणांना अटक केली आहे
रियाविरुद्ध ईडीकडे नाही एकही सबळ पुरावा
अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे एम्सच्या अहवालात शिक्कामोर्तब झाले असताना त्याची आर्थिक संपत्ती अभिनेत्री रियाने लुबाडल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासातून स्पष्ट झाले आहे. सुशांतच्या खात्यावरून रिया व तिच्या कुटुंबीयांशी व्यवहार झाला नसल्याने त्यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा खटला चालवू शकत नाही, या निष्कर्षाप्रत अधिकारी पोहचले आहेत.